'मुझसे शादी कर' म्हणत महिलेचा विनयभंग;

एमआयडीसी पोलीसा ठाण्यात गुन्हा दाखल
'मुझसे शादी कर' म्हणत महिलेचा विनयभंग;

जळगाव - शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचा तिच्या नात्यातील व्यक्तीने 'मुझसे शादी कर' असे म्हणत विनयभंग केल्याची घटना १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुप्रिम कॉलनीत घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री १० वाजेच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणाऱ्या २८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्या शहरातील एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. १९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे महिला रिक्षाने हॉस्पिटलमध्ये कामाला जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी त्यांच्या नात्यातील जवळचा वक्ती आबीद तसलीम पिंजारी रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी याने (एमएच १९ एएफ ४८२१) क्रमांकाच्या दुचाकीने महिलेचा पाठलाग केला व ती काम करत असलेल्या हॉस्पिटलपर्यंत आला. रिक्षातून उतरल्यानंतर त्याने महिलेला 'मुझसे शादी कर, मै तेरा खर्चा उठाऊंगा' असे सांगून अश्लिल शिवीगाळ केली व विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी २० एप्रिल रोजी रात्री १० वाजता विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आबीद तसलीम पिंजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com