करगाव येथून सात हजारांचा बोकड लांबवला

करगाव येथून सात हजारांचा बोकड लांबवला

ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील करगाव तांडा नं.३ येथून एकाच्या घरासामोर बांधलेला सात हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा बोेकड दोघांनी चोरुन नेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तात्या मानसींग राठोड रा. करगांव तांड क्र.३ यांच्या मालकीचा घरासमोर बांधलेला काळ्या रंगाचा सात हजार रुपये किमतीचा बोकड दि,१ ते २ मार्चच्या दरम्यान गावातीच सुनील साहेबराव पाटील व त्यांच्या साथीदाराने चोरुन नेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तात्या मानसींग राठोड यांच्या फिर्यादीवरुन सुनील साहेबराव पाटील व त्याच्या नाव गाव माहित नसलेल्या साथीदारवर गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. गोवर्धन बोरसे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com