बनावट डेबीट कार्डने १३ हजार लंपास

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
बनावट डेबीट कार्डने १३ हजार लंपास

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या टाकळ प्र.चा.भागात राहणार्‍या एकाच्या बॅके खात्यानून बनावट डेबीट कार्ड तयार करून, खात्यातील १३ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाकळी प्र.चा. भागातील निलेश अजबराव पाटील (वय-३३) या तरूणाने चाळीसगाव शहरातील एका खासगी बँकेत खाते आहे. १७ मे रोजी सकाळी ८.४० ते ८.४१ वाजेच्या दरम्यान बँकेच्या खात्याशील जोडलेल्या डेबीट कार्डचे बनावट नवीत कार्ड तयार करून, खात्यातील १३ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com