<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p>चाळीसगाव पोलीस मैदानच्या अवारातून तलाठीने अवैद्यरित्या मुरुमाची वाहतूक करणारे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालक व मालकाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.</p>.<p>याबाबत सविस्तर वृत्त असे की, विनोद कृष्णराव मेन,(तलाठी) रा. चाळीसगाव, यांनी दि, २१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धुळे राडे आदर्शनगर भागात एक लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे विना नंबरचे ट्रॅक्टर पकडले, ट्रॅक्टरची तपासणी केली असता, त्यात अवैद्यरित्या मुरुम भरलेला आढळुन आला. तलाठी विनोद मेन यांनी हे ट्रॅक्टर चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या मैदानात आनून लावले. परंतू दुसर्या दिवशी हे ट्रॅक्टर त्याठिकाणाहून ट्रॅक्टर चालकाने मालकाच्या सांगण्यावरुन पळवून नेले. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला तलाठी विनोद मेन यांच्या फिर्यादीवरुन टॅ्रक्टर चालक विनोद एकनाथ भोसले, रा.तरवाडे, व मालक बापू भाऊराव काळे रा.खरजई यांच्याविरोधात भादवी कलम ३७९, १८६ व ३४ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.</p>