चोरी चोरी छुपके छुपके व्यवसाय करणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

फुले मार्केट येथील समाधा या कपड्याच्या दुकानावर कारवाई
चोरी चोरी छुपके छुपके व्यवसाय करणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल

जळगाव- Jalgaon

शहरातील फुले मार्केट येथे जिल्हाधिकारी यांचे बंदचे आदेश असतांनाही अर्धे शटर उघडे ठेवून चोरी चोरी छुपके छुपके व्यवसाय करणार्‍या समाधा या दुकानावर शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी आज बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास कारवाई केली. याप्रकरणी दुकान मालक विशाल ग्यानचंद ठारानी वय ३३ रा. सिंधी कॉलनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हयात जिल्हाहिधकारी यांचे कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त इतर आस्थापणा बंद ठेवण्याबाबतचे आदेश आहे. बाज बुधवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजकुमार मदनसिंग धांडे, पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे हे शहरातील फुले मार्केट परिसरात गस्त घालत होते.

यावेळी यांना फुले मार्केटमधील समाधा नावाचे कपड्याचे दुकान नं २२५ या दुकानाचे अर्धे शटर उघडे दिसले. चौकशी केली असता, यात दुकानात एक ग्राहक विना मास्क असल्याचे दिसून आले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करणार्‍या या दुकानावर पोलिसांनी कारवाई केली.

याप्रकरणी कर्मचारी राजकुमार धांडे याच्या फिर्यादीवरुन दुकान मालक विशाल ग्यानचंद ठारानी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com