यंदा 3 लाख 25 हजार मेट्रीक टन खतांचा पुरवठा होणार

80 हजार मेट्रीक टन युरियाचा साठा दाखल; शेतकर्‍यांना होणार बांधावर वाटप
यंदा 3 लाख 25 हजार मेट्रीक टन खतांचा पुरवठा होणार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाणे व खते सुलभपणे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडून तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या मागणीनुसार खते व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हयासाठी मुबलकप्रमाणात खातांचा साठा उपलब्ध करण्यात आला असून खतांची कोणत्याही प्रकारे टंचाई जाणवणार नाही. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

पी.एस.महाजन, जिल्हा मोहीम अधिकारी, जि.प.जळगाव

त्यासोबतच जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच 80 हजार मेट्रीक टन युरियाचा साठा दाखल झाला असून शेतकर्‍यांच्या आवश्यकतेनुसार तालुकानिहाय वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

तालुकानिहाय शेतकर्‍यांना खतांचा पुरवठा बांधावरच

दर महिन्याला खतांसंदर्भात जिल्हा कृषी विभागाकडून प्लानिंग करण्यात येत असून केंद्र शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी केलेल्या मागणीनुसार खतांचा पुरवठा देण्यात येतो. यंदा 3 लाख 25 हजार मेट्रीक टन खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एप्रिल व मे महिन्यात मागणीनुसार जळगाव जिल्ह्यासाठी 80 हजार मेट्रीक टन युरियाचा साठा दाखल झाला आहे. तालुकानिहाय शेतकर्‍यांना खतांचा पुरवठा बांधावरच करण्यात येणार आहे.

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह प्रत्येक तालुकास्तरावर समिती नियुक्त करण्यात आलेली आहे. शेतकर्‍यांना जाद दराने बियाणे व खते विक्री करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिला आहे.

शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न द्विगुणित करण्यासाठी अनेक योजना आहेत. मात्र, यंदा विकेल ते पिकेल या योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकर्‍यांना मिळत नसल्याने अनेक शेतकरी आजही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत.अद्यापी उत्पादन खर्चावर आधारीत हमीभावापासून शेतकरी वंचित आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com