कृषीमंत्र्यांना पाठवले शेतकऱ्यांनी २००० पत्र
जळगाव

कृषीमंत्र्यांना पाठवले शेतकऱ्यांनी २००० पत्र

शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

Rajendra Patil

यावल - प्रतिनिधी - Yaval

महाराष्ट्रामध्ये पीक विमा योजनेचे निकष बदलण्यासाठी कृषि आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीचा अहवाल 15 जुलै 2020 रोजी येणे अपेक्षित होते, परंतु सदर अहवाल आज पावेतो

प्राप्त न झाल्याने महाराष्ट्र सरकार ने या वर्षी 2020 ला बदलून दिलेले निकष च लागू करावे लागतील आणि सदर निकष शेतकऱ्यांसाठी मारक आहेत आणि हे निकष पुढील 3 वर्ष बदलणार नाहीत. जळगाव जिल्यात

केळी पिकाखाली 48000 हेक्टर जमीन असून एवढ्या सर्व शेतकऱ्यांना या निकषामुळे नुकसान भरपाई मिळणे मुश्किल होईल किंवा मिळणारच नाही, हा निर्णय केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक

आहे आणि सदर निर्णय आणि निकष बदलणे अत्यंत गरजेचे आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी कृषीमंत्री व पालकमंत्री यांना २००० पोस्ट कार्ड लिहून पाठवून संताप व्यक्त केला आहे.

या वर्षी लॉकडाउनमुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत, त्यात पुढील वर्षी हवामान बदलाच्या संकटामुळे नुकसान झाले तर नुकसान भरपाई सुद्धा मिळाली

नाही तर शेतकऱ्याचे कंबरडे मोडेल आणि या प्रकाराला महाराष्ट्र शासन आणि त्यांचे धोरण जबाबदार असेल. सद्यपरिस्थिती मध्ये जमावबंदी असल्याने शेतकरी अजून शांत आहे आणि कृषिमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री यांना पत्र लिहून आम्ही सर्व यावल तालुक्यातील शेतकरी निषेध नोंदवत आहे. जर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही तर

शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासन जबाबदार राहील. शेतकऱ्यांवर अन्याय करून विमा कंपनीचे पोट भरण्याचे कुभांड शासन रचत आहे हे सदर निर्णयातुन स्पष्ट होते.

तसेच स्वतःच्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पीकाचे निकष न बदलता जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना वान्यावर सोडण्याचे काम कृषीमंत्री यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या घरी पत्र पाठवून निषेध नोंदविण्याचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांनी घेतला आहे. आणि त्या अंतर्गत 2000 पत्र कृषी मंत्री आणि पालकमंत्री यांना प्रतिनिधीक स्वरूपात लिहून पाठवित आहोत.

यासाठी 2000 पोस्टकार्ड कृषिमंत्री आणि पालकमंत्री यांचा पत्ता टाकून आम्ही शेतकऱ्यांना दिलेत त्यांचे मत त्यावर लिहून मागवले आणि सर्व पत्र आम्ही पोस्ट ऑफिस मध्ये पाठविण्यासाठी दिलेत बऱ्याच शेतकऱ्यांनी आपापल्या गावातल्या टपाल पेटीत ते टाकलेत.

यासाठी डॉ. कुंदन फेगडे,राकेश फेगडे,डॉ.निलेश गडे,प्रमोदशेठ नेमाडे, सुनिल पाटील,कोमल चौधरी, संदीप भारंबे , डॉ.पराग पाटील,गोपाल सिंग राजपूत,भुषण फेगडे, स्नेहल फिरके, रितेश बारी, उज्वल कानडे, निर्मल चोपडे, सागर चौधरी, कोमल इंगळे, संजय फेगडे आदी उपस्थित होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com