<p><strong>रावेर|प्रतिनिधी Raver</strong></p><p>बाजार भावापेक्षा पाच-सहाशे रुपये अधिक भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीत हरभरा विक्रीसाठी एक दिवस आधी पासून रांगा लावल्या आहे. अख्खी रात्र नोंदणी करणाऱ्या शेतकी संघाच्या कार्यालयापुढे शेतकऱ्यांनी जागून काढली. यामुळे केळी पट्ट्यातील शेतकरी शेतमालाच्या योग्य भावासाठी किती धपडत करत आहे चित्र स्पष्ट होत आहे.</p>.<p>येथील शेतकी संघाने केंद्र सरकारच्या नाफेडच्या वतीने बुधवार पासून हरभरा नोंदणी सुरू केली आहे.यासाठी दोन दिवस आधी नांव नोंदणी करण्यासाठी आवाहन केले असता,शेतकऱ्यांनी मंगळवारी सायंकाळ पासूनच शेतकी संघाबाहेर रांगा लावल्या,सुमारे ५००शेतकरी नांव नोंदणी साठी आले आहे. </p>