शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत घेतले गाडून

शेतकरी पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी वंचीत
शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत घेतले गाडून

मुक्ताईनगर । वार्ताहर Muktainagar

पी.एम.किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) या योजनेच्या लाभापासून जळगाव जिल्ह्यातील जवळपास पंचवीस ते तीस हजार शेतकरी वंचित आहेत. शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी (Dr.Vivek Sonawane) डॉ.विवेक सोनवणे तसेच बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतले.

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथे डॉ.विवेक सोनवणे व बहुजन मुक्ती पार्टी यांच्या नेतृत्वाखाली दफनविधि आंदोलन पार पडले.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात वर्षाकाठी सहा हजार रुपये या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील या योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळतो. याच संदर्भात जळगाव जिल्ह्यातील पी.एम.किसान सन्मान निधी या योजनेच्या लाभापासून जळगाव जिल्ह्यातील जवळपास पंचवीस ते तीस हजार शेतकरी वंचित आहे.

मागील वर्षी केळीवर सी.एम.व्ही.नावाचा व्हायरस आला होता. त्या व्हायरसमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. मे महिन्यात जे चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले ती नुकसानभरपाई सुद्धा आद्यापपर्यंत शेतकर्‍यांच्या रक्कम जमा झाली नाही. याच सर्व शेतकर्‍यांच्या हिताच्या मागण्यांसाठी आज डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात दफनविधि आंदोलन पार पडले.

या आंदोलनाची सांगता जिल्हा प्रशासनाकडून व मुक्ताईनगरचे नायब तहसिलदार प्रदीप झांबरे, वानखेडे यांनी लेखी आश्वासन देऊन तात्काळ सर्व कामे मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी आंदोलनकर्ते डॉ.विवेक सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सोंदळे, ब्रिजलाल इंगळे तसेच मुक्ताईनगरचे पो.नि. राहुल खताळ, पोलिस उप निरीक्षक निलेश साळूंके, तालुका कृषी अधिकारी श्री.माळी तसेच शेतकरी, सुरेश पाटील, शैलेश पाटील, कमील रौफ, गौतम प्रधान, संजय बुवा, सचिन चौधरी, एकनाथ पाटील, एन. टी.महाजन, विवेक पोहेकर, उल्हास पाटील, पवन वानखेडे, मुकेश तायडे, किशोर महाजन, राम सोनार, वैभव पाटील,शांताराम बेलदार, रघुनाथ पोहेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com