जोगलखेडे येथे शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू
जळगाव

जोगलखेडे येथे शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

Rajendra Patil

पारोळा - प्रतिनिधी

तालुक्यातील जोगलखेडे येथील एका 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा त्याच्या स्वत:च्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजता उघडकीस आली.

याबाबत जोगलखेडे येथील कैलास लोटन पाटील (वय 30) हा काल दि.28 रोजी शेतात निंदणीसाठी जातो असे सांगून गेला तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी शोध शोध केली मात्र कैलास हा मिळून आला नाही.

आज दुपारी त्याच्या स्वत:च्या शेतात कैलासचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून कुटीर रुग्णालयात दाखल करून डॉ.योगेश साळुंखे यांनी तपासून मयत घोषित केले.

याबाबत नातेवाईकांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आशिष चौधरी करीत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील व भाऊ असून कैलास हा अविवाहित होता.

Deshdoot
www.deshdoot.com