भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

भक्तीमय वातावरणात  बाप्पाला निरोप

जळगाव jalgaon ।

पाच दिवस मनोभावे बाप्पाची आराधना (Worship of Bappa) केल्यानंतर आज मोठ्या भक्तीमय वातावरणात (devotional atmosphere) पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन (Immersion) करुन निरोप देण्यात आला.

वर्षभर सर्वच जण बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या आठवड्यात मोठ्या चैतन्यमय वातावरणात जल्लोषात बाप्पाचे आगमन झाले होते बहुतांश जण दहा दिवस बाप्पाचे मनोभावे पुजा करीत असतो. तर अनेकांकडे दीड दिवसत अनेक जण पाच दिवसांसाठी बाप्पा विराजमान होत असतात.

आज बाप्पाचे आगमन होवून पाच दिवस झाल्याने जिल्ह्यातील चोपडा, अडावद, यावल, रावेर याठिकाणी पाच दिवसांनंतर बाप्पाचे विसर्जन होत असते. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी गर्दी होवू नये म्हणून शहरातील चौकाचौकांमध्ये मुर्ती संकनासाठी स्टॉल लावण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी याठिकाणी मुर्तींचे संकलन केल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून या मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न पार पडावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा बाधित होवू नये. म्हणून जिल्हाभरातील पोलिसांचा बंदोबस्त पाच दिवसांचे गणपती विसर्जन होणार्‍या ठिकाणी लावण्यात आला होता. त्यामुळे गणेशविसर्जन शांततेत पार पडले.शांततेर झाले बाप्पाचे विसर्जन

यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक मंडळांना मिरवणुक काढण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पाच दिवसांच्या बाप्पाचे सर्वत्र शांततेत विसर्जन झाल्याने बाप्पाला मोठ्या भक्तीमय वातावरणात निरोप दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com