दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप

मेहरुण तलावाच्या गणेश घाटात विसर्जन
दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भक्तीमय व जल्लोषपूर्ण वातावरणात शुक्रवारीच आपल्या लाडक्या बाप्पाचे (Bappa) आगमन झाले. दरम्यान शनिवारी दुपारी मोठ्या भावपूर्ण नयनांनी दीड दिवसाच्या (A day and a half) बाप्पाचे विसर्जन (Immersion)करीत निरोप (good bye) देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाची लगबग सुरु होती. शुक्रवारी संपुर्ण देशभरात आपल्या लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले असून गणरायाचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अनेकांकडे दहा दिवसांसाठी काही जणांकडे दीड दिवसांच्या बाप्पांचे आगमन झाले होते. दरम्यान आज दुपारी दीड दिवसाच्या बाप्पाला शहरातील मेहरुण तलावावरील गणेश घाटावर मोठ्या भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाची अखेरची आरती करुन विसर्जन करीत त्याला निरोप देण्यात आला.

शिल्लक मुर्त्यांची पॅकेजींग

शहरातील सर्वच भागांमध्ये गणरायाच्या मुर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. दरम्यान तीन दिवस स्टॉवर मुर्तींची विक्री केल्यानंतर अनेक मुर्तीकारांकडे गणेश मुर्ती शिल्लक राहिल्या आहेत. आज या मुर्ती विक्रेत्यांकडून पॅकेजींग करुन त्या पुढच्या वर्षी विक्री करण्यासाठी सुरक्षीत रित्या ठेवल्या जात आहे.

कपुर लावून ऋषी पंचमी साजरी

गणेश चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी ऋषी पंचमी असल्याने या दिवशी नदीसह त्रिवेणी संगमावर स्नान करीत त्याठिकाणी पुजन केले जात असते. दरम्यान मेहरुण तलाव येथे महिलांनी कपुर व दिवे पाण्यात सोडत त्याठिकाणी पाण्याचे पुजन करीत ऋषी पंचमी साजरी करण्यात आली.

पथदिव्यांची दुरुस्ती

विसर्जनासाठी गणेश घाटावर मोठया प्रमाणात गर्दी होत असते. तसेच या ठिकाणी असलेले पथदिवे बंद असल्याने सायंकाळनंतर अंधार पसरले असतो. दरम्यान, कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून मनपाकडून विसर्जन मार्गासह गणेश घाट परिसरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com