32 मृत गुरांना घेवून जाणारा कंटेनर पकडला

32 मृत गुरांना घेवून जाणारा कंटेनर पकडला

फैजपूर पोलिसांची कामगिरी ; पाच संशयितांना अटक

फैजपूर । प्रतिनिधी

येथील फैजपूर ते खिरोदा रोडवर फिल्टर हाऊसच्या समोर रोडवरील झुडपात मोकळ्या जागेत सुमारे 10 लाख रुपये किमतीचा एक टाटा मोटर्स कंपनीची (10 टायरी) ट्रक (कंटेनर ) क्रमांक यु.पी. - 21 बी.एन.3071 मध्ये गोवंश जातीच्या गुरांना नेत असता त्या गुरांना हालचाल करण्यास व श्वासोच्छावास घेण्यास पीडा होईल अशा परिस्थितीत त्याचे पाय व मानेस दोराने ट्रकचे दोन्ही बाजुस असलेल्या लोखंडी कड्यांना निदर्यपणे बांधुन कोंबुन गुरांची कत्तल करण्याचे उद्देशाने गुरे वाहतुकीचा कोणताही पास परवाना नसतांना वाहुन नेत असता ट्रक मध्ये 5,85,000 रु किमतीचे 32 गुरे ( बैल) असुन त्यांचे अंदाजे वय 3 ते 9 वर्षे मृत अवस्थेत, त्याच प्रमाणे 87000 रु किमंतीच्या दोन गाई असून त्यात एक देशी गाय अंदाजे 8 वर्षांची व एक जर्शी गाय अंदाजे 9 वर्ष मृत अवस्थेत मिळून आली.

या सर्व गुरांची किंमत 16,72,000 रु असून हा ट्रक (कंटेनर) एम.पी.मधून येत असतांना मिळून आला आहे. या ट्रक (कटेनर) वरील चालक नामे नाव मुन्ने खान प्यारेलाल रा.ईस्लाम नगर, बाबरपुरा, अजितमल ओरिया (उ.प्र.), सलिम शब्बीर तडवी, शेख साजिद शेख सगीर खाटीक दोन्ही रा. फैजपुर ता. यावल, शेख कालु शेख यासीन रा. कुरैशी मोहल्ला, वरणगांव ता. भुसावळ, शेख बिलाल शेख अय्युब रा. सावदा या आरोपितांना अटक करण्यात आली.

पो.नाईक कॉ. उमेश वसंत चौधरी यांच्या फिर्यादी वरून फैजपुर पो.स्टे.ला सी.सी.टि.एन.एस.गु.रजि.नं. 66 / 2021 प्राणी कुरता प्रतिबंध कायदा कलम - 11 (ड) (इ) (फ) (क) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन-1976 चे व सन-2015 पर्यतचे सुधारणे सह कलम-5 (अ). 5 (ब) सह मो.वा.का.- कलम- 83 / 177 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-1951 चे कलम-119 व भा.द.वि.कलम 429 व 188 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पंचनामा पो. उप निरीक्षक. मसलोद्दीन शेख यांनी केला.

पुढील तपास डी.वाय.एस.पी.नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय.प्रकाश वानखडे, पो.उप निरीक्षक. मसलोद्दीन शेख, पी.एस.आय.रोहिदास ठोंबरे, हे.कॉ.रवींद्र मोरे, पोलीस नाईक कॉ. उमेश चौधरी, अजमद पठाण, विकास सोनवणे करीत आहे. मृत गुरांना आर.सी.बाफना गोशाळेच्या आवारात खड्डा खोदून पूरण्यात आले..

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com