आरटीई प्रवेशासाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या प्रादुर्भावामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात आली आहे. जिल्ह्यात 296 शाळांनी नोंदणी केली असून आरटीई प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून राबविण्यात आली आहे.

जिल्ह्यात 15 तालुकास्तरावर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन पडताळणी करण्यात येत आहे. पहिल्या फेरीत 2600 पैकी 1600विद्यार्थ्यांचा 29 जून रोजी प्रवेश निश्चित करण्यात आला असून 30 जून रोजी 1700 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.

30 जून रोजी प्रवेश निश्चितीसाठी शेवटची फेरी होती. मात्र, या फेरीसाठी 9 जुलैपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. 9 जुलैनंतर उर्वरीत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चितीसाठी प्रतिक्षायादीवरील विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी 7 एप्रिल रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 15 एप्रिलनंतर कळविण्याचे शिक्षण विभागाकडून ठरविण्यात आले होते.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आरटीईची प्रवेश प्रक्रिया लांबणिवर पडली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात 296 शाळांची नोंदणी केलेली असून, 3 हजार 65 आरक्षित जागांसाठी 5 हजार 939 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते.

या अर्जांची छाननी करण्यात आली असून, पहिल्या फेरीत 2 हजार 695 अर्जांची निवड करण्यात आली. पात्र ठरलेल्या 1700 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com