प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांना मुदतवाढ
जळगाव

प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांना मुदतवाढ

६५ वर्षापर्यंत मिळाली वाढ

Rajendra Patil

फैजपूर - प्रतिनिधी Faizpur

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.पी आर.चौधरी यांना प्राचार्यपदी ६२ वर्षावरून ६५ वर्षापर्यंत अशी तीन वर्षाची मुदतवाढ मिळाली.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी यांनी प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एस.के.चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, व्हॉ. चेअरमन के.आर.चौधरी, सचिव मुरलीधर फिरके, सदस्य मिलिंद वाघुळदे, प्रकाश राणे तसेच सर्व शाखांचे प्राचार्य डॉ.व्ही.आर पाटील, डॉ.आर.एल चौधरी, डॉ.धांडे तसेच संस्थेचे लिपिक नितीन सपकाळे हे उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com