video : आपले मोठायकी वाटसं नही, ती बिचारी वाची जावो...

मदतीसाठी थेट अंगावरची साडी काढून देणार्‍या विमलाबाई भिल यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात
video : आपले मोठायकी वाटसं नही, ती बिचारी वाची जावो...

किशोर पाटील - Jalgaon - जळगाव :

चोपडा तालुक्यातील सातपुडा येथील जंगलात विमान कोसळून अपघात झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर चर्चा सुरु आहे, ती विमानातील जखमी शिकाऊ पायलट अंशिका गुजर हिला वाचविण्यासाठी तयार केलेली बांबुच्या काठयांची अन् साडीची झोळी, ती मदतीसाठी चक्क अंगावरची साडी काढून देणार्‍या विमलाबाई भिल या महिलेची.

आयुष्यात एकही वर्ग शाळा न शिकलेल्या अशिक्षित विमलाबाई यांनी एक महिला म्हणून मुलीला वाचविण्यासाठी चक्क अंगावरची साडी काढून सर्व जगासमोर माणुसकीचा आदर्श उभा केला. त्या मदत अन् माणुसकीबद्दल विमलाबाईचा गुरुवारी सत्कार करण्यात आला.

विमान अपघाताच्या त्या थरारक अनुभवाबद्दल, जखमीला केलेल्या मदतीबद्दल, मदती मागचा त्यांचा दृष्टीकोन, हा विमलाबाई यांच्याच शब्दात...

मंनी वू...अन् पोरग्यासंगे, वावरमा, काम करी रायन्तू, तेवमाढाच एक ईमान गरकनी उनं...मी पन देखाले लागनू... बापरे...बापरे...ते ईमान झाडसना जाईसनी पडनं.. ढमकनी.. असा तेना आवाज व्हयना..मी पोर्‍याल सांग...चाल भाऊ आपण ईमान देखाले जावूत. मग आम्ही तढे गवूत...ईमान मा बसेल बाईना हात भी फसेल अन् अन् पाय भी फसेल व्हता. मेरे को पानी पिलाव, अशी ती फसेल बाई म्हणाले लागनी. मातर आम्ही पाणीच सोबत लीसनी

जायेल नवतू..मना आंडोरनी, एक बाटली झामली, दोन बुच पाणी पाजी दिनं. जास्त पिनी तं धनुरवात हुई जाई म्हणून आंडेरकडून बाटली हिसकाय लीनी..मग तिले नाव विचारं..अंशिका गुजर पाटील खरगोन अस तिन्ही नाव सांगं...आमनाफा...कोनी नवत. काढता काढता काई व्हुयी जायी...म्हणीशनी मी आंडेरल त्या पोरगीले काढू दिन नही...चार एक जणीसनी पोरीगेले काढ अन् दुनीया पयाला लाग गयी....मग येल लोकसले मी, त्या पोरले उचलानं सांग, नुसत उचलान सांगस आजी, पण कसाला लि जावूत...अस लोकं म्हनाले लागतात, मन लुकड ल्ही ल्या भो, झोका बांधीसनी तिला तीले हालाडा,आस मी बोलनू...मना अंगावर ठेवापुरत लुगड ठीशनी बाकीनं फाडीशीनी दिन, पण झोका खाले लपके, मंग मी मना नातूसना रुमाल काढीसनी, त्या बी झोका लपकावाले नको, म्हनीशनी बांधात..मंग गयराच लोक ऊनात, जशी की जत्राचं...जंगल माईन तीन किलोमीटर लोग रस्ताकडे त्या ईमानमा फशेल पोरले ली गयात...

कोनी मतबलमा गयत तर कोनी कसासाठे...

ज्या ठिकाणले ईमान पडन, त्याठिकाणवर गयरा लोक उनता..कोनी कागद झामले तर कोनी काय, मंग मी लोकसले सांगं........कागद नका उचला, त्या बाईला हालाडा, असे जोरमाहीन बोलनूं.... कोनी मतलब मा गयतं...कोनी कसा गयतं...मातर मी बाईले बरा व्हयनं वाचाडाले गयतूं....त्या पोरले मी मन लुगडं फाडीशीनी दिनं, त माले कोनी सांगे की तु पैसा मांगजात...कोनी सांगे की तुमी तडे जायजातं...पण त्या लोकंसले मी सांगं, हायी बाई वाचनीनं, त तीनी मना नातूसले चांगला आशिरवाद देवाले पाहिजेलं...आनं त्या चांगला राव्हाले पाहिजेल, वर्डी ना मी बचेल शे, एवढी आठवण त्या पोरनी ठिवाले पायजेल...मांगा साठे अन् मतलब साठे मी तडे नई गयतू..मी फक्त ईमान देखाले न् त्य पोरले वाचडासाठे गयतू...बिचारीनं चांगल झाय ती वाचीगयी येवढच वाटस... पोरंगी वाचाडासाठे मी लुंगड दिनं, या कामनं माले मोठायकी वाटसं नही, ती बिचारी वाचीजावो, माले भेटाले येवो, मना नातूसले आशिरवाद देवो येवढच वाटस.....

मदत कराले..भेटंनी हायी बी पुण्य कमाडाले नशीबं लागसं....

पोलीसले लय जीव घाबरसं, मना पोरग्या भी पोलीस भरतीले गयता, तव्हे, मी तो भरती नही व्होवाले पाहिजेल म्हनीशनी देवले नारळ फोडं होतं. पहिलांदाच पोलीससले भेटनू तेसना हाते सत्कार व्हयना, तेनं चांगल वाटी रायंनं.. आते लोक आकाशना नजर पुराई पुराईशीनी ईमान देखं...पहिलांसाव इतला जवळून ईमान देखाले भेटनं मातर ते भी असा घटनांमा...मी ईमान देखालेच गयतू...तडे जायीसन, पोरगीले देखेलवर कोठलाबी विचार मनमा हुना नही फकस्त तिले मदत कराले..भेटंनी हायी बी पुण्य कमाडाले नशीबं लागसं....

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com