चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

राज्यातील महावितरण कंपनी च्या वतीने उपकेंद्र सहायक पदासाठी एस ई बी सी प्रवर्गातुन निवड झालेल्या मराठा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत डावलण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय असून उपकेंद्र सहाय्यक पदभरतीत मराठा समाजाच्या तरुणांची कागदपत्रे पडताळणी करण्यात यावी यासाठी जळगाव जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हावितरणचे अधीक्षक अभियंताना दि २ रोजी निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे.

महावितरण विभागात उपकेंद्र सहायक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्या अनुषंगाने दि. १ व २ डिसेंबर २०२० रोजी महावितरण कंपनी कार्यालयात कागदपत्रे पडताळणी होत आहे.परंतु या कागदपत्रे पडताळणी मधून मराठा समाजातील एस ई बी सी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय आहे.एस ई बी सी प्रवर्गात निवड झालेल्या तरुणांची सुद्धा दि-१ व २ तारखेला कागदपत्रे पडताळणी पूर्ण करण्यात यावी.तसेच मराठा समाजातील मुलांना भरती प्रक्रियेत डावलून एक प्रकारे मराठा समाजाची अवहेलना केली जात आहे.या विरोधात मराठा समाजात प्रचंड संतापाची भावना आहे.

महावितरणच्या कृतीचा जळगाव मराठा क्रांती मोर्चा जाहीर निषेध करीत असून झालेली चूक तात्काळ सुधारण्यात यावी अन्यथा मराठा समाजातून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही. सदर न्याय मागणी पूर्ण न झाल्यास सपूर्ण महाराष्ट्र भरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व राज्य सरकार जबाबदार राहणार असल्याचे दि २ डिसेंबर २०२० रोजी जळगाव विभागाचे महावितरण कार्यालय अधिक्षक अभियंता शेख यांना जळगाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनावर प्रमोद पाटील, गणेश पवार, रवी देशमुख, विनोद देशमुख, गणेश पाटील, रामधन पाटील, अविनाश पाटील , देवेंद्र पाटील, संजय कापसे, गुणवंत पाटील, गुलाबराव आभाळे, विशाल देशमुख, बाबूलाल चव्हाण, योगेश कदम, संजय शिंदे, सुरेश पवार यांच्यासह मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.