जळगाव : आसोदा येथे माजी सैनिकाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव

जळगाव : आसोदा येथे माजी सैनिकाची गळफास घेवून आत्महत्या

सेवानिवृत्तीनंतर बस आगारात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीस होते

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी

तालुक्यातील आसोदा येथील माजी सैनिक गणेश भिकन कोळी (वय ४५) यांनी ३० रोजी दुपारी अडीच वाजेपूर्वी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

गणेश कोळी हे तुरखेडा (ता.जळगाव) येथील मूळ रहिवासी होते. सध्या ते आसोद्यात राहत होते. बीएसएफमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते बस आगारात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीत करीत होते. त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी घराच्या पुढील भागात बसले होते. या वेळी गणेश कोळी यांनी मागील घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

काही जण मागील घरात गेल्यानंतर कोळी यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले आणि कुटुंबीयांनी आक्रोश केला. हा प्रकार परिसरातील इतरांच्या लक्षात आला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईक कोळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात घेवून गेले. परंतु, त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन विसपुते यांनी खबर दिली. त्यावरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हवालदार सतीश हाळनोर करीत आहेत. गणेश कोळी यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com