भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतनतर्फे ‘स्त्रीधन लिमिटेड’ची स्थापना

सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा यांची पत्रपरिषदेत माहिती : आज उद्घाटन
भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतनतर्फे ‘स्त्रीधन लिमिटेड’ची स्थापना

पारोळा Parola। श प्र

प्रत्येक गृहिणींना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थेतर्फे राज्यात मीर्च मसाला नामक आउटलेट सुरू करून स्त्री धन लिमिटेडची 'Stridhan Limited स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मॅगसेसे पुरस्कार विजेत्या व सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा Neelima Mishra यांनी विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन ही संस्था गेल्या 22 वर्षांपासून बहादरपुर येथे अर्थव्यवस्थेसाठी शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय स्वतंत्र विचार करता यावा म्हणून अथक प्रयत्न करीत आहे. हजार दोन हजार महिलांसाठी व्यवसाय उभे करणे सोपे आहे. मात्र प्रत्येक गृहिणींना आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा यासाठी काय उपाय होईल म्हणून संस्था प्रयत्न करीत आली. वेळप्रसंगी कर्ज उचलून या कामाला पूर्णत्वासाठी अथक प्रयत्न संस्थेकडून आणि संस्थेच्या टीम कडून झाले आहेत . शोध होता तो प्रत्येक महिलेला, आपल्या छोट्या मोठ्या गरजांसाठी आर्थिक सक्षम किंवा आर्थिक आत्मनिर्भर होण्याचा. बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी अनेक मर्यादा येतात.

मग तो भांडवल असेल कच्चामाल योग्य दरात योग्य ठिकाणाहून शोधण्याच्या असेल, माल प्रक्रियेमध्ये मशीनचा वापर करण्यामध्ये असेल किंवा तयार झालेल्या मालाचे मार्केटिंग असेल, या सर्व प्रक्रियांसाठी महिलांना खूप मर्यादा येतात. घर संसार सांभाळून , जर महिलांना ही कामे करायला लागली तर ते अवघड असते, काम असे असावे जेणेकरून महिलांना आपल्या घरच्या जबाबदार्‍या सांभाळून आपल्या छोट्या मोठ्या गरजांसाठी आर्थिक आत्मनिर्भर होता येईल. यासाठी दोन महत्त्वाच्या रचना करण्यात आले आहेत एक म्हणजे स्वयंपाक घरातील वस्तू जे प्रत्येक घराला दैनंदिन जीवनात आवश्यक असतात अशा वस्तूंची निर्मिती बहीणा या नावाने करण्यात आली. आणि दुसरी रचना स्त्रीधन निधी लिमिटेड या नावाने बँकिंग व्यवस्था सुरू करण्यात आली.

या माध्यमातून ज्या महिला रजिस्टर असतील त्या गृहिणींनी बहीणा ब्रँडच्या मिरची हळद धने पावडर मसाले खरेदी केल्यास , त्याचे शेअर्स स्त्रीधन निधी लिमिटेड यामध्ये मिळतात. उदाहरणार्थ एक किलो मिरची पावडर घेतल्यास 50 रुपयांचे शेअर्स या महिलेच्या नावाने जमा होतील.बहिण ब्रांड दोन गोष्टींसाठी स्वतःला बांधील मानते एक म्हणजे वस्तूची शुद्धता आणि बाजार दर. प्रत्येक वस्तू मागे शेअर्स मिळण्याची सुविधा या महिलांसाठी करण्यात आलेली आहे.

महिलांनी स्वतःसाठी घरात लागणार्‍या वस्तू घेतल्या किंवा इतरांना त्या विक्री केल्या तर त्यांच्या नावाने शेअर्स जमा होतात.या जमा झालेल्या शेअर्सचे लाभांश दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी , चलन स्वरूपात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निधी लिमिटेडच्या नियमानुसार एकंदर शेअर्सच्या वीस पटीने डिपॉझिट जमवणे आवश्यक आहे.

20 ऑगस्ट रोजी स्त्रीधन निधी लिमिटेड तसेच याचे उद्घाटन करण्यात येत आहे. ज्या महिलांनी मिर्च मसाला घेतले त्यांना शेअर्स वाटप करण्यात येत आहेत. याशिवाय मिर्च मसाला या प्रकल्पाची सुरुवात ही या दरम्यान घोषित करण्यात येत आहे.

सदर प्रकल्प हा राज्यभर असून पारोळा,बहादरपूर येथे बँकेची शाखा सुरू होत असून बीड जिह्यातील गेवराई नाशिक,नगर येथही आउटलेट सुरू होत असून बचत गटांना मागणी नुसार पुरवठा केला जाईल.

ज्या त्या भागानुसार मिरची,हळद,धना ,मसाले ,जिरे हे पावडर व वस्तू स्वरूपात स्वतःच्या कच्चा माल पुरवला जाईल यात घरपोच सेवाही दिली जाईल. सदर प्रकल्पास जळगाव पीपल बँकेचे सहकार्य मिळत असल्याचे नीलिमा मिश्रा यांनी स्पष्ट केले.यावेळी वैशाली पाटील व सरिता चौधरी उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com