पर्यावरणदिनी ऑनलाइन हरीत वैज्ञानिक द़ृष्टिकोन चाचणी

वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम; 316 निसर्गप्रेमींचा सहभाग
पर्यावरणदिनी ऑनलाइन हरीत वैज्ञानिक द़ृष्टिकोन चाचणी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

निसर्गमित्र जळगावतर्फे वसुंधरा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यव्यापी ऑनलाइन हरीत वैज्ञानिक दृष्टीकोन चाचणीत 316 निसर्गप्रेमींचा सहभाग पाच राज्य व बहरीनमधून सुद्धा निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन अभिनव उपक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीचे औचित्य साधुन प्रसारीत करण्यात आला.

राज्यव्यापी ऑनलाइन हरीत वैज्ञानिक दृष्टीकोन चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 316 नागरिक सहभागी झाले.

त्यात महाराष्ट्रातील 304 अन्य पाच राज्यातील 11 व बहरीन येथील 1 असे एकूण 316 निसर्गप्रेमी नागरिक सहभागी झाले.

यात महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यातील महिला 181 व पुरुष 120 आणि इतर 04 जण सहभागी झाले. या चाचणीत जळगाव, चहार्डी, चुंचाळे 57, धुळे, साक्री, पिंपळनेर 54,पुणे,चिंचवड 50, नाशिक 20,मुंबई 15,ठाणे 12,रत्नागिरी 9, कोल्हापूर, सांगली,औरंगाबाद प्रत्येकी 8 अमरावती,सोलापूर, सातारा प्रत्येकी 7,सातारा,नागपुर,अकोला,लातूर,सिंधुदुर्ग प्रत्येकी 5, चंद्रपूर 4,नांदेड,गडचिरोली प्रत्येकी 3,अहमदनगर,लातूर,नंदुरबार,रायगड,पालघर प्रत्येकी 2, बिड,बुलढाणा,परभणी,नवी मुंबई,यवतमाळ प्रत्येकी 1

छत्तीसगढ,उत्तरप्रदेश,हिमाचलप्रदेश,दिल्ली येथून प्रत्येकी 2,गोवा 1 व बहरीन येथून 1 या प्रमाणे निसर्गप्रेमीने सहभाग नोंदवल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.

22 एप्रिल 1970 पासून जगभर वसुंधरा दिन साजरा केला जातो. वसुंधरा दिन साजरा करण्यास राचेल कार्सन यांची सायलेंट स्प्रिंग ही लेखमाला कारणीभूत ठरली.

ही लेखमाला द न्यू यॉर्कर या साप्ताहिकाने प्रसिद्ध केली. या साप्ताहिकाने कोणत्याही दबावाला बळी न पडता ही मालिका प्रसिद्ध केली. त्यामुळे लोक जागृत झाले व पर्यावरण चळवळीला बळ मिळाले.

त्यावर आधारित सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक 1962 साली प्रकाशित झाले.या घटनेतून प्रसार माध्यमांची ताकद व त्यांचे महत्व व माध्यम स्वातंत्र्याची गरज अधोरेखित होते.

हे लक्षात घेऊन या विषयावर आधारित दहा प्रश्नाची हरीत वैज्ञानिक दृष्टीकोन ही चाचणी घेतली. या चाचणीतून दिलेल्या उत्तरातून लोकांची भूमिका स्पष्ट झाली. या मध्ये सहभागी निसर्ग प्रेमींचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला.

साप्ताहिकाचे नाव व पुस्तकाचे नाव 60 टक्के लोकांना जरी सांगता आले नाही तरी माध्यमांची पर्यावरण विषयक बांधिलकी,भूमिका,धोरण त्यांना हवे असणारे स्वातंत्र्य या मुद्याला 90%लोकांनी होकारात्मक प्रतिसाद दिला.

विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांसाठी दिलेल्या विविध पर्यायांमधून हरीत उत्पादन व्यवस्था हवी, जैव विविधता नष्ट झाल्याने नवनवीन विषाणू जन्माला येत आहेत.

मानवाने अन्नसाखळीचा समतोल राखून विकास केला पाहिजे,प्रदूषित शेती नाकारली पाहिजे,चुकीच्या विकासनीतीमुळे हवामान व तापमान बदल होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com