व्यवसायातील नुकसानामुळे उद्योजकाची आत्महत्त्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्यामुळे आदर्शनगरातील वृद्धााने राहत्या घराच्या कंपाउंडमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. या वृद्धाने आत्महत्येपूर्वी लिहुन ठेवलेल्या सुसाईट नोटमधुन कारण स्पष्ट झाले आहे.

शेजारच्यांमुळे प्रकार उघड

मिरचुमल मथुरादास बजाज (वय 64, रा. आदर्शनगर) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. मिरचुमल बजाज हे आदर्शनगरात एकटेच राहत होते. त्यांना ऑईलचा व्यवसाय होता. सोमवारी मध्यरात्री त्यांनी घराच्या कंपाउंडमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.

मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास शेजारी राहत असलेल्या रहिवाश्यांना मिरचुमल हे गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. त्यांनी लागलीच त्यांच्या कुटूंबियांना संपर्क साधून घटना कळवली. ही घटना रामानंदनगर पोलिसांना कळताच, त्यांनी देखील घटनास्थळ गाठुन पंचनामा केला.

यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. यावेळी कुटुंबिय, नातेवाईकांची रूग्णालयात गर्दी झाली होती. या प्रकरणी रवी बजाज यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र पाटील, चेतन अहिरे तपास करीत आहेत.

आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये

मिरचुमल बजाज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात व्यवसायात नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ज्यांच्यामुळे नुकसान झाले अशा काही लोकांचीही नावे लिहीलेली आहेत. परंतू, आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये असाही उल्लेख त्यांनी केला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com