<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p>शहरात अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेल्या रहिवशांना नगर परिषदेकडून नोटीसा देवून काही एक उपयोग होत नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील अनाधिकृतपणे केलेले अतिक्रमण काढण्यास न.पा.तर्फे सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी शहरातील छाजेंड ऑईल मागील कुरेशी गल्लीत जवळपास ४० ते ५० घरांचे अनाधिकृत अतिक्रमण न.पा.च्या पथकाने काढले. यात पत्राशेड, शौचालय, ओटा, गाळे आदिचा समावेश आहे. </p>.<p>ही कारवाई मुख्याधिकारी शंकरराव गोरे आणि नगराध्यक्षा आशलता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे अभियंता विजय पाटील, अतिक्रमण विभागप्रमुख प्रेमसिंग राजपूत, लिपीक भुषण लाटे, आरोग्य विभागाचे तुषार नकवाल, सुमित सोनवणे, तुषार माने, मेहुमुद बेग, भगवान आगोणे, वकार शेख, सलीम शेख, सुनील चौधरी, राजेंद्र चौधरी आदिच्या पथकाने केली.</p>