विद्युत सुधारणा विधेयक रद्द करा;11 राज्यांचाही विरोध
जळगाव

विद्युत सुधारणा विधेयक रद्द करा;11 राज्यांचाही विरोध

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

(Electricity Reform Bill) विद्युत सुधारणा विधेयक रद्द करा, वीज उद्योगांसह सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण धोरण रद्द करा या मागण्यांसाठी नॅशनल कोऑर्डिनेशन कमेटी ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लाईज अँड इंजिनिअर्स आणि वर्कर्स फेडरेशनतर्फे देशभर काळीफीत लावून निषेध करण्यात आला.

3 जुलै 20 ला देशातील वीज कामगार/कर्मचारी/अभियंत्यांनी विद्युत सुधारणा विधेयक 2020 चे विरोधात आंदोलन करून विरोध प्रदर्शन केले होते. 11 राज्य सरकारांनी सुद्धा या विधेयकाचा विरोध केला आहे. पुढील आंदोलनाचा टप्पा म्हणून 18 रोजी विद्युत सुधारणा विधेयक 2020 रद्द करा आणि वीज उद्योगांसह सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण धोरण रद्द करा या मागणीसाठी देशभर काळीफीत लावून निषेध करण्यात आला.

यानुसार जळगांव येथे वर्कर्स फेडरेशन,ईंटक, आणि सबॉर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे कामावर येणारे अभियंते , कर्मचारी यांना काळी फीत लावून सरकारचा निषेध करण्यात आला.या मध्ये महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन चे कॉ.विरेंद्रसिंग पाटील परिमंडळ सचिव , कॉ.श्रीमती संध्या पाटील , कॉ.भगवान सपकाळे,कॉ.दिनेश बडगूजर,कॉ.मुकेश बारी कॉ.प्रभाकर महाजन,कॉ.एफ एम मोरे,,कॉ.निलेश भोसले विभाग संघटक, कॉ.विक्रांत देसले, कॉ.आकाश राऊत, तसेच यांनी सहभाग नोंदविला.

संपूर्ण जळगाव परिमंडळ मधील जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांतील महावितरण,पारेषण, निर्मिती कंपनी चे सर्व शाखा व झोन पदाधिकारी कॉ.जे एन बाविस्कर व्यवस्था पन सदस्य, कॉ.पी वाय पाटील केंद्रीय सल्लागार, नाना पाटील प्रभारी संयुक्त सचिव , विजय सुर्यवंशी सर्कल सचिव नंदुरबार, प्रकाश कोळी सर्कल सचिव, जळगाव, विशाल पाटील सर्कल सचिव धुळे, किरण नांद्रे झोन सहसचिव, , हेमंत बारी, सुधीर पाटील ,दीपक सोनवणे,विजय चितळकर ,पराग नाईक,विनोद कांगणे धुळे, अनिल भालेराव,प्रकाश पवार, सुनिल सोनवणे, गोकुळ सोनवणे मुक्ताईनगर, देविदास सपकाळे,रविंद्र गायकवाड, सागरराज कांबळे यांचेसह इतर सहभागी होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com