चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यात झालेल्या ७६ ग्रा.पं.च्या निवडणुकांमध्ये चर्चेचा विषय असलेल्या टाकळी प्र.चा. ग्रामंपचायतीच्या सरपंच व उपसरपंचा पदाचा धक्कादायक निकाल लागला आहे.

सरपंचपदी कविता सतिष महाजन व उपसरपंचपदी किसनराव जोर्वेकर यांची निवड झाली आहे. उपसरपंचपदी किसनराव जोर्वेकर यांची निवड झाल्यामुळे सर्वांना अर्श्चाचा धक्का बसला असून पुन्हा एकदा ते टाकळीची सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले आहेत.

त्यामुळे तालुक्यातून अनेक राजकिय चर्चांना ऊत आला आहे. टाकळी ग्र.पं. एकूण १७ सदस्य निवडुन आले असून ही निवड १० विरुध ७ अशी झाली आहे. निवडणुक निर्णय आधिकारी म्हणून जितेंद्र माळी व ग्रामविकास आधिकारी यशवंत राजपूत यांनी कामकाज पाहिले. विजीय उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.