खडसेंची ‘ईडी’समोर सात तास चौकशी

एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसेEknathrao Khadase

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पुणे येथील भोसरी जमीन खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी मुंबईच्या ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजता हजेरी लावली आहे.

खडसे यांची तब्बल सात तास ईडीच्या अधिकार्‍यांनी विचारणा केली. या चौकशी काय विचारणा केली त्याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

युती शासनाच्या कार्यकाळात मंत्री असताना एकनाथराव खडसे यांनी भोसरी जमीन खरेदी केल्याचा ठपका ठेवल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

याप्रकरणी चार ते पाच वेळी चौकशी झालेली आहे. मात्र, मुंबईच्या ईडी कार्यालयाने नोटीस पाठूवन 30 डिसेंबरला हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले होते.

मात्र, त्याचदरम्यान कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने त्यांनी वकिलामार्फत 14 दिवसानंतर ईडी कार्यालयात हजर राहण्याविषयी पत्र दिले होते.

14 दिवसानंतर खडसे यांनी शुक्रवारी मुंबईच्या ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजता हजेरी लावली असून 11 ते 5.30 वाजेपर्यंत तब्बल सात तास ईडीच्या अधिकार्‍यांनी खडसे यांची चौकशी केली.

मात्र, या चौकशीदरम्यान कोणकोणत्या विषयावर विचारणा केली याची माहिती समजू शकली नाही. दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांचा मोबाईल स्विचऑप होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com