आठऑक्सिजन एक्सप्रेस धावल्या
ऑक्सीजन टँकर रॅक

आठऑक्सिजन एक्सप्रेस धावल्या

६५.२९ टन प्राणवायू उतरविला

भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal -

विभागातून १९ एप्रिल ते दिनांक २० मे पर्यंत ०८ ऑक्सिजन एक्सप्रेसचे परिचालन करण्यात आले. त्यातील एका ऑक्सिजन एक्सप्रेसने भुसावळ विभागातील नाशिक स्टेशन येथे ४ ऑक्सिजन टँकर्स (६५.२९ टन ऑक्सिजन) उतरवण्यात आले आहे. डिआरएम विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून टँकर्स उतरविण्यात आले आहे.

ऑक्सीजन टँकर रॅक
दहावीची परीक्षा रद्दच्या निर्णयावर उच्च न्यायालय नाराज, म्हणाले...

प्राणवायूच्या पुरवठ्यात येणारे सर्व अडथळे दूर करत व अडचणींवर मात करत, देशभर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करण्याचे काम भारतीय रेल्वेकडून अविरत चालू आहे. भारतीय रेल्वे कोविडच्या विषम परिस्थितीत देशातील लोकांना मदत करण्यासाठी पुढे येऊन ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी द्रव ऑक्सिजनने भरलेले टँकर सतत घेऊन जात आहे. यामध्ये भुसावळ विभागात २४ एप्रिल रोजी नाशिक रोड येथे विशाखापटनम येथून ४ ऑक्सिजन टँकर असलेली ऑक्सिजन एक्सप्रेस आली त्यामध्ये रेल्वे कर्मचारी यांनी आपला अनुभव सांगितला आहे कि हे कार्य करताना त्यांना रेल सेवक सोबत कोरोना योद्धा म्हूणन त्याचे चांगले अनुभव कथन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com