ईद उल अजहा घरातच साजरी
जळगाव

ईद उल अजहा घरातच साजरी

जळगाव मध्ये शांततेत ईद साजरी

Pankaj Pachpol

जळगाव-Jalgaon

जळगाव शहर आणि परिसरात आज ईद उल अजहा घरातच साजरी झाली.कोरोना महामारीमुळे सणातील उत्साह जाणवला नाही. शासनाचे आणि ईदगाह ट्रस्ट ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच कुटुंबासमवेत ईदची नमाज अदा केली. शहरातील सुन्नी आणि तबलिगी जमातीच्या ५४ मशिदीत पेश इमाम व ट्रस्टीनी फिजिकल डिस्टसिंग चे पालन करीत नमज अदा केली.

कोरोनामुळे कुर्बानीचे प्रमाण कमीच होते.शुक्रवार ३१ जुलै रोजी जामा मशीद येथे रुहते हिलाल कमिटीची बैठक मौलाना उस्मान कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.१ ऑगस्ट रोजी ईद घरातच साजरी करण्याचे ऐलान मौलाना कासमी यांनी केले होते. कुर्बानिमुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत,कोरोना नष्ट व्हावा यासाठी दुआ करण्याचे आवाहन इदगाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक सरचिटणीस हाजी फारुख शेख, हाजी क्रीम सालार व पदाधिकाऱ्यांनी केले होते.त्याला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून ईद साजरी केली.

सुन्नी जमात इदगाह ट्रस्ट चे अध्यक्ष सय्यद अयाजअली नियाजअली व सुन्नी जामा मशिदीचे पेश इमाम मौलाना जाबिन रझा यांनी ईद घरातच साजरी करण्याचे आवाहन यापूर्वीच केले असल्याने समाज बांधवांचा त्याला सम्पूर्ण पाठींबा मिळाल्याचे अयाजअली यांनी सांगितले.शहर आणि परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

Deshdoot
www.deshdoot.com