यावल - Yawal

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव जवळ आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात इतका भयंकर होता की यात पंधरा जण जागीच ठार झाले असून अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा आयशर ट्रक पपई ने भरलेला असून तो धुळे जिल्ह्यातून रावेर कडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. मैदान मधील सर्व मजूर वर्ग हा रावेर तालुक्यातीलच् असल्याचे समजते.

कुटुंबातील अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मध्ये सर्व मजूर वर्ग असून यात यात एकाच कुटुंबातील अकरा जणांचा समावेश आहे.

अपघाताचे वृत्त समजताच डीवायएसपी श्री पिंगळे घटनास्थळी पोहोचले. सोमवारची पहाट मोठ्या दुःखद घटनेने उजाडली.