दिंडोरीच्या आयशर चालकाचा पारोळा शिवारात खून

दिंडोरीच्या आयशर चालकाचा पारोळा शिवारात खून

पारोळा - Parola- योगेश पाटील

तालुक्यातील करंजी गावाजवळील मध्यरात्रिच्या सुमारास राजस्थानी ढाबासमोर दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथील आयसर चालकाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चाकूने सपासप वार करून खून केला व रस्त्याच्या कडेला फेकून दिले असून आरोपी हा ट्रक घेऊन फरार झाला आहे.

जऊळके, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील रहिवासी असलेला द्वारका मुखराम यादव (वय 50) याच्या ताब्यातील वाहन एम एच 15 इ जि 5671 स्वराज कंपनीच्या गाडीने नाशिक येथून दि. 7 रोजी बर्जर रंगाचा माल भरून पारोळा व जळगावला खाली केला.

त्यानंतर जळगाव येथून ओम ईंडस्ट्रीयल मधून 125 डाळीचे कट्टे घेऊन तो त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता नाशिकला रवाना होण्यासाठी निघाला असता दि. 7 व 8 च्या मध्यरात्री पारोळा तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक 6 वर करंजी गावाच्या काही अतरावर असलेले के एफ सी राजस्थानी ढाब्याजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने द्वारका यादव यास चाकूने मानेवर सपासप वार करून खून केला व त्यास रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात फेकून दिले व अज्ञात आरोपी याने यादव याच्या ताब्यातील स्वराज कंपनीचा माझडा गाडी घेऊन फरार झाला ही घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

यावेळी घटनास्थळी चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे, अमळनेर प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल, एलसीबी पोलिस निरीक्षक बापू रोहम, पारोळा पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, हेडकॉन्स्टेबल रवींद्र रावते, हेडकॉन्स्टेबल नाना पवार, हेडकॉन्स्टेबल इक्बाल शेख, अनिल वाघ, कॉन्स्टेबल प्रवीण पारधी, मोहसिन खान, पोलीस पाटील कल्पना विकास पाटील, यांनी धाव घेतली असता परिसरात यादव यांचा मृतदेह पडलेला होता. त्याचा जवळ एक धारधार चाकू पडलेला होता. रक्ताच्या थारोळ्यात हा इसम पडलेला असताना व त्या जवळ गाडीला लावण्याच्या जॅक व कलरच्या डब्या, ब्रश, पाण्याची बाटली त्यावर रक्ताचे डाग लागलेले असे मिळून आले.

या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला याबाब घटनास्थळी आरोपीच्या शोधार्थ श्वान पथकास पाचारण करण्यात आले असता सदर श्वान खुन झाला त्या ठिकाणीच घुटमळत होता असे निदर्शनास आले, फिंगर प्रिंट पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, आले होते.

याबाबत पारोळा पोलिसात तानाजी खंडेराव जोंधळे यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध यादव यांचा खून करून गाडी घेऊन फरार व जबरी लूट असे गुन्हे दाखल करण्यात आले याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com