‘संडे हो या मंडे’ महागाईमुळे कसे खाणार अंडे

‘संडे हो या मंडे’ महागाईमुळे कसे खाणार अंडे

तीन दिवसात भाववाढीचा उच्चांक; शेकड्यामागे अडीचशे रुपयांची वाढ

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अंडी ही शरीरारासाठी पौष्टीक असल्याने डॉक्टरांकडून त्याचे नियमीत खाण्याचा सल्ला दिला जात असतो. परंतु गेल्या तीन-चार दिवसात एका ट्रेमागे 45 रुपयांची भाववाढ झाली आहे.

त्यामुळे घाऊक विक्रेत्यांकडून प्रति ट्रे 175 ते 180 रुपयाप्रमाणे त्याची विक्री केली जात असल्याने सर्वसामान्यांना अंडी खाणे परवडतील का? असा प्रश्न आता पडू लागला आहे.

शरीरातील प्रोटिन्स वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून अनेकांना आपल्या दैनंदिन आहारात अंडीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जाता असतो. त्यानुसार जाहीरातींमध्ये सण्डे हो मण्डे रोज खाओ अंडे अशी जाहीरात देखील केली जात असते. तसेच

पौष्टिक ब्रेकफास्ट म्हणून अंडीपासून तयार केलेल्या पदार्थांनाच प्रधान्य दिले जात असल्याने त्यामुळे शरिर देखील सुदृढ राहते. यातच कोरोनाकाळात बाधित रुग्णांच्या शरिरातील प्रोटिन्स वाढविण्यासाठी त्यांच्या दिवसभराच्या आहारात किमान दोन अंडी देण्याच्या सुचना केंद्र शासनाकडून दिल्या आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांना अंडी खाण्यासाठी दिले जात असल्याने गेल्या दिड वर्षापासून अंडींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. तसेच महागाईने सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असून यामध्ये अंडीचा देखील समावेश आहे.

शहरात पारोळा तालुक्यातील मुक्टी आणि इतर पोल्ट्री फार्ममधून तसेच अहमदाबाद येथूनही अंडी घाऊक व्यापार्‍यांकडे येत येतात. यातच अंडीची होलसेलविक्री करणारे अत्यंत कमी दुकाने शहरात आहेत. ऐरवी दिवसाला 7 ते 8 हजार अंडीची विक्री होते. हिवाळ्यात यामध्ये वाढ देखील होते. गेल्या आठवड्यात शहरात 400 ते 450 रुपये शेकडा अंडीची विक्री केली जात होती. मात्र तीन दिवसात यामध्ये पंचवीस रुपयांनी वाढ झाली मात्र आज यात पुन्हा 20 रुपयांनी वाढ झल्याने आता 600 ते 640 रुपये प्रमाणे त्याची होलसेल विक्रेत्यांकडून विक्री केली जात आहे.

कृत्रीम तुवटड्यामुळे भाववाढ

अंडी ही शरिरासाठी उब देणारी असल्याने हिवाळ्यात अंडीना प्रचंड मागणी असते. मात्र कोरोनाझालेल्यांना किंवा कोरोना ज्यांची प्रतिकारक्षमता कमी आहे त्यांना प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जात असल्याने हिवाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यात देखील अंडीची मागणी कायम आहे. तसेच उन्हळ्यात अंडी खराब होण्याची शक्यता अधिक असल्याने त्याचा तुटवडा निर्माण होते. त्यामुळे अंडीच्या भावात वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तसेच लॉकडाऊनच्या नावाखाली अनेक विक्रेत्यांकडून तुटवडा देखील केला जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गावराणी अंडीचा भाव दुप्पट

पोल्ट्रीच्या अंडीपेक्षा गावरणी अंडी घेण्याकडे नागरिकांचा अधिक कल असतो. याचाच फायदा घेत काही नागरिक लहान अकाराची लेयर अंडी घेवून ती चहाच्या पाण्यात ठेवतात. त्यामुळे या अंडीचा रंग तपकिरी होवून ती गावराणी अंडीसारखी दिसतात. ही अंडी गावराणी असल्याचे सांगत काही जण त्याची पोल्ट्रीपेक्षा दुप्पट भावाने त्याची विक्री करीत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. तसेच ज्यांच्या घरी घरी कोंबड्या पाळलेल्या आहेत. त्यांच्याच कडी गावराणी अंडी मिळत अल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com