जळगावात भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले
जळगाव

जळगावात भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

महामार्गावरून भरधाव वेगात जात असलेल्या वाळूच्या डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास खोटे नगर स्टॉपजवळ घडली. महामार्गाने आज पुन्हा एकाचा बळी घेतला. दरम्यान धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून डंपर चालक फरार झाला असून डंपर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

अनिल वसंत पाटील (वय-57) रा. चितोडा ता.यावल ह.मु. नारायण नगर, बिबा नगर हे एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होते. कंपनीतून दुचाकी (एमएच 19 एएन 2697)ने सायंकाळी घरी जात असतांना खोटे नगर स्टॉपजवळ जळगावकडून बांभोरीकडे जाणार्‍या वाळूच्या (एमएच 19 झेड 5756) डंपर न ेधडक दिली. दरम्यान यावेळी ते महामार्गालगत सुरू असलेल्या खड्ड्यात पडल्याने मागुन येणार्‍या त्याच डंपरच्या चाकाखाली ते चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघात झाल्यानंतर नागरीकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्यांच्याच गल्लीत राहणारे योगेश बाविस्कर आणि गौतम गवई या तरूणांनी मयत अनिल पाटील यांना ओळखले. त्यांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.मयत अनिल पाटील यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा अजय आणि मुलगी जयश्री असा परीवार आहे. ज्योती पाटील ह्या मु.जे. महाविद्यालयाजवळ असलेल्या ओरीयन्ट इंग्लीश मिडीयम स्कूलला शिक्षिका आहेत तर दोन्ही मुले हे एसएसबीटी इंजिनिअरींग कॉलेजला शिकत आहे.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे रात्री उशीरापर्यंत सुरू होते. दरम्यान महामार्गावर होणार्‍या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जळगावकर नागरिकांकडून होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com