संततधार पावसामुळे दूथडीभरून वाहू लागल्या नद्या
जळगाव

संततधार पावसामुळे दूथडीभरून वाहू लागल्या नद्या

संततधार पावसाचा परिणाम

Rajendra Patil

पिंपळनेर - वार्ताहर Dhule

पिंपळनेर पश्चिम पट्यात संततधार पाव सामुळे सर्व जलाशये भरले पाझरेच्या मुख्य प्रवाहात पाण्याचा स्त्रोत वाढला, परिणामी परिसरातील नद्या दूथडीभरून वाहू लागल्या, त्या नद्या कोणत्या आहेत बघूया...

पिंपळनेर व आदीवासी पश्चिम पट्यात जुलैमध्ये पाऊस नव्हता त्यामुळे शेतकरी चिंतातुर होता. भात, नागली मूख्य पिके हातरोपणी थाबली होती मात्र गल्या तीन-चार दीवसा पासून जमखेली,पांझरा, वटखळ व कान नदीच्या उगमस्थानावर संततधार पावसामुळे सर्व लहान मोठे जलाश तुडुंब भरले असून वठखळ एम.आय. टँक, लाटीपाडा व जामखेली, बुरूडके एम.आय.टँन्क, मालनगगा धरण पुर्ण क्षमतेने भरले..

पांझरा नदीवरील लाटीपाडा धरण सर्वात मोठे धरण असून 258 एम.सेप्टी जलसाठा असून या नदीचा उगम शेंदवड भवानी गडावर असून या डोंगरावरून तीन नद्यांच्या उगम आहे, धुळे जिल्ह्यात पांझरा, गुजरातमध्ये पुर्वा व नासिक जिल्ह्यातील मोसम नदींचा उगम आहे सर्व नद्या दुथडी भरून वहात आहेत पांझरा नदी ही धुळे जिल्ह्याची जीवन दायीनी आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com