लसीबाबत शुक्रवारी जळगाव जिल्हा रुग्णालयात ‘ड्राय रन’

लसीबाबत शुक्रवारी जळगाव जिल्हा रुग्णालयात ‘ड्राय रन’

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जगात थैमान घातलेल्या करोनाच्या कोविशिल्ड, को-व्हॅक्सीन लसींना आपत्कालीन स्थितीत वापरण्यास परवानगी मिळाली आहे.

जिल्हाभरात पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील सुमारे 14000 जणांना ही लस दिली जाणार आहे. याबाबत ड्राय रनची चाचणी 8 जानेवारी रोजी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात घेतली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हाभरातील आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींची माहिती मागणविण्यात आली होती.

जिल्ह्यात कोरोना लसीकरण अगोदर आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना केले जाणार आहे. त्यासाठीची माहिती जिल्हा रुग्णालयातर्फे संकलीत करण्यात आली आहे.

जिल्ह्यात अजून कोवीडची लस आलेली नसली तरी शासनाने जिल्हा रुग्णालयांना रंगीत तालीम घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.

त्यानुसार 8 जानेवारी शुक्रवारी सकाळी 8 वाजेपासून जिल्हा रुग्णालयात लसीकरणाची रंगीत तालीम सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ड्राय रनसाठी 3 रूम राखीव

जिल्हा रुग्णालयात कोविडच्या लसीकरणासाठी तीन रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी 25 वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना बोलाविले जाणार आहे.

आलेल्या व्यक्तींचा अगोदर पोलिसांच्या निगराणीतून जावे लागेल. त्यानंतर पहिल्या रुममध्ये त्यांची नोंदणी शिक्षकांकडे होईल.

त्या व्यक्तीची नोंद केल्यानंतर ती व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रातीलच आहे याची खात्री करेल. त्याची माहिती फीड करेल दुसरा कक्ष व्हॅक्सीनिशन रूम असेल. त्यात लसीकरण करण्याची तालीम होणार आहे.

अर्धा तास ठेवणार निगराणीत

लसीकरण झाल्यानंतर तिसरा कक्ष निरीक्षण कक्ष असेल. यामध्ये लस देण्यात आलेल्या व्यक्तीला अर्धातास निरीक्षणाखाली ठेवून लसीचा त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे का किंवा नाही याची पाहणी केली जाईल. अर्धातासानंतर संबंधितांना घरी सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com