धानोरा ता.चोपडा - वार्ताहर Chopada

हिवाळ्यात परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिपच सुरू झाली आंसू न .त्याचा रब्बी पिकांना मोठा फटका बसणार असल्याने अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा होरपडा जाऊन आर्थिक संकटात सापडणार आहे.

धानोरा-बिडगाव सह परिसरातील मोहरद, वरगव्हान, देवगाव, पारगाव, लोणी, पंचक खर्डी, पुणगाव, मितावली आदि गावांना पावसाळ्यात अति पावसाने झोडपून काढल्याने खरीपाचा हंगाम वाया गेला व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, कांदा भुईमूग अशा पिकांची पेरणी केली. आता पिकेही चांगली बहरू लागली होती आणि आता डिसेंबर महिना लागल्याने गुलाबी थंडी पडून पिके आणखीनच जोमात येतील असे वाटत असतांनाच शेतकरींच्या या पिकांवर पुन्हा अस्मानी संकटाची वक्र दृष्ट पडली.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरणासह धुके पडत पावसाची रिपरिप सूरू झाली आहे. त्यामुळे गव्हाची लवकर निसवण होऊन रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. तर हरभराची फुलगळ होऊ लागली आहे. तसेच आधीच अतिशय महागडे बियान्यापासून रोप तयार करुन लावलेल्या कांदावर करपा, मर रोगसह थ्रीप्स सारखे कीटक पडू लागले आहेत.

तर ढगाळ वातावरणामुळे कांदासह भुईमूग, मका, गहु आदि पिकांवर अळ्यांचाही प्रार्दुभाव वाढू लागल्याने रंबी हंगामच डोक्यात आला असून उत्पादनात मोठी घट येणार असल्याचे वारंवारच्या अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हापुन्हा भरडला जात असल्याने आता पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहे हे मात्र निश्चित.