अतिरिक्त आकारलेल्या बिलाचे पैसे डॉ.किनगेंना करावे लागले परत

‘देशदूत’ची दखल अन् तरुणाला न्याय...
अतिरिक्त आकारलेल्या बिलाचे पैसे डॉ.किनगेंना करावे लागले परत

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश किनगे यांना अतिरीक्त घेतलेले 2 लाख 44 हजार रुपये परत करण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते.

या आदेशानंतरही डॉ. किनगे यांनी तरुणाला सहा महिने पैसे फिरवाफिरव करुन पैसे दिले नाही. याबाबत तरुण दिपक कावळे याने केलेल्या तक्रारीनुसार दै. देशदूतच्या वृत्तानंतर यंत्रणा हलली अन् जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील लेखाधिकारी कैलास सोनार यांच्या उपस्थितीत डॉ. निलेश किनगे यांनी तरुणाला संबंधित 2 लाख 44 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतरही फिरवाफिरव

नशीराबाद येथील दिपक छगन कावळे या तरुणाची आई 10 सप्टेंबर 2020 रोजी अँक्सान ब्रेन हॉस्पीटल येथे दाखल होत्या. हॉस्पिटलमध्ये 26 दिवस उपचार घेतल्यानंतर डॉ. निलेश किनगे यांनी उपचाराच्या बिलाचे सुमारे 4 लाख 60 हजार इतके बील काढले होते.

याबाबत दिपक कावळे याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी तक्रार निकाली काढल्यानंतर जिल्हा शल्यचिकीत्सकांनी अतिरीक्त वसुल केलेली 2 लाख 40 हजारांची रक्कम परत करण्याच आदेश 3 डिसेंबर 2020 रोजी डॉ. किनगेंना काढले होते.

या आदेशानंतरही डॉ. किनगेंकडून सहा महिन्यांपासून फिरवाफिरव केली जात होती. याबाबत दिपक कावळे याने डॉ. निलेश किनगे व गजानन पाटील यांच्या विरूद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी अशी मागणी आरोग्यमंत्री टोपे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापौर ज्योती महाजन यांच्याकडे केली होती.

‘देशदूत’ची दखल अन् तरुणाला न्याय...

पियुश नरेंद्रराव पाटील यांच्याकडूनही तरुणाला न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला. दिपक कावळे या तरुणाला न्याय मिळावा म्हणून दै. देशदूतने या प्रकरणाला वाचा फोडत दि. 23 जून रोजीच्या अंकात निलेश किनगेंविरोधात आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार अशा शिर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केली होती.

वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनातील यंत्रणा हलली. 30 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी कैलास सोनार यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे सुनावली झाली. डॉ. निलेश किनगे तसेच दिपक कावळे उपस्थित होते.

यावेळी डॉ. किनगे यांनी कावळे या तरुणास अतिरिक्त वसूल केल्याल्या 2 लाख 44 हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश दिला. दरम्यान न्याय मिळाल्याने दिपक कावळे या तरुणाने दै. देशूदतचे आभार मानले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com