चाळीसगाव : ‘इनरव्हील’च्या अध्यक्षपदी डॉ.चेतना कोतकर
जळगाव

चाळीसगाव : ‘इनरव्हील’च्या अध्यक्षपदी डॉ.चेतना कोतकर

ऑलाईन पध्दतीने पार पडला पदग्रहण सोहळा

Rajendra Patil

चाळीसगाव । प्रतिनिधी

इनरव्हील डिस्ट्रीक्ट 303 अंतर्गत चाळीसगाव इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.सौ.चेतना विनोद कोतकर, सेक्रेटरीपदी सोनू पवानी, कोषाध्यक्ष अनघा अग्रवाल यांची निवड झाली आहे.

इनरव्हीलच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन पध्दतीने पार पडलेल्या या पदग्रहण समारंभाचे अध्यक्षस्थानी वसुधा चंद्रचुड तर प्रमुख अतिथी म्हणून मीनल लाठी होत्या. रोटरी परिवाराअंतर्गत येणारा सेवाभाव इनरव्हीलच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा संकल्प यावेळी डॉ.चेतना कोतकर यांनी बोलून दाखविला.

याप्रसंगी कुमकुम दोशी, मिनल भावसार, सिमा शर्मा, निता सामंत, संध्या गुप्ता, सारीका गुप्ता आदि उपस्थित होत्या. तर ज्येष्ठ सदस्या डॉ.हेमांगी पूर्णपात्रे जुलेखा शुक्ला, कल्पना धामणे, लिलावती जगताप, कुमोदिनी पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत केले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com