स्विटमार्टमधून गुटखा जप्त

दोघां व्यापार्‍यांवर गुन्हा, पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
file photo
file photo

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शहरातील दोन स्विट मार्ट दुकानातून 7 हजार 970 रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

बुधवारी दुपारी पोलिसांसह अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी दोघा व्यापार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्यासह परि. सहा. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 4 रोजी दुपारी राणी मा प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये ज्योती स्विटमार्टची तपासणी करण्यात आली.

तेव्हा मालक राजकुमार मोहनदास रोहिडा (वय 48 रा. सिंधी कॉलनी) यांच्याकडे 1 हजार 920 रूपये किंमतीचा गुटखा मिळून आला.

तर बाजुला असलेल्या बाबा स्वीट मार्टचीही तपासणी करण्यात आली. दुकान मालक गुरुबक्श हुंदराजमल रोहिडा (वय 42 रा. सिंधी कॉलनी) याच्याकडे 6 हजार 50 रूपयांचा गुटखा मिळून आला.

दोघांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू युक्त सुगंधीत गुटखा विक्रीसाठी साठवणूक करीत असल्याचे आढळून आले. एकुण 7 हजार 970 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर याच्या फिर्यादीवरून वरील दोघा व्यापार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक आसाराम वाडिले करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com