मोकट कुत्र्यांचा त्रास : आयुक्तांना दिली कुत्र्यांची पिल्ले भेट

पिसाळलेल्या कुत्र्यांसह मोकाट कुत्र्यांचा शहरात हैदोस
मोकट कुत्र्यांचा त्रास : आयुक्तांना दिली कुत्र्यांची पिल्ले भेट

जळगाव - Jalgaon

शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांसह पिसाळलेल्या कुत्र्यांचा उद्रेक झाल्याने व वारंवार पाठपुरावा करुनही प्रश्‍न सुटत नसल्याने सत्ताधारी गटाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचेकडून चक्क कुत्रे भेट म्हणून आयुक्तांना देण्यात आली.

आयुक्तांच्या दालनात हा प्रकार मंगळवारी स्थायी सभेच्या प्रारंभीच घडला. यावेळी दारकुंडे यांचेसोबत नगरसेवक किशोर बाविस्कर, नगरसेविका ज्योती चव्हाण व नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते. या प्रकाराने मनपा प्रांगणात सारेच अचंबित झाले होते. या विषयाचीच सर्वत्र चर्चा होत होती.

८ वर्षीय चिमुकल्याचा बळी

गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगर झोपडपट्टी भाग तसेच हरीओम नगरात शहराबाहेरील काही लोक इतर कामासाठी शहरात दाखल झालेले होते. बाहेर गावाहून आलेल्या या नागरिकांचा लहानसा चिमुकला कुत्र्यांच्या चाव्याने दगावला गेला होता.

तसेच याच परिसरातील स्लम एरियातील अन्य एक महिला ही किराणा घ्यावयास बाहेर गेली असता तिलाही कुत्र्यांनी चावा घेतला तीही गंभीर जखमी झाली होती. म्हणून या भागाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी ही बाब आयुक्तांसमोर मांडली होती. आयुक्तांना याबाबतचे पत्रही दिले होते. जेणे करुन कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून नगरसेवक दारकुंडे यांनी सतत पाठपुरावा मनपा आयुक्तांकडे केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले असे नगरसेवक दारकुंडे यांनी स्पष्ट केले.

पिसाळलेले कुत्र्यांचा उद्रेक

गेल्या काही दिवसापासून पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रकार शहराच्या विविध भागात होत आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी नागरिकाकडूनही सातत्याने करण्यात येत आहेत. तसेच ही पिसाळलेले कुत्रे पकडण्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

शहरात सर्वदूर मोकाट कुत्र्यांसह पिसाळलेल्या कुत्र्यांचाही उद्रेक झालेला आहे. नागरिक या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने करीत आहेत. मात्र मनपाकडून अद्याप कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही. यासाठी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी प्रतिकात्मक भेट म्हणून दोनतीन कुत्रे पकडून आणून ते आयुक्तांना भेट म्हणून देण्यात आले. यावेळी सहा. आयुक्त पवन पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

मनपा प्रांगणातही मोकाट कुत्रे

मोकाट कुत्र्यांचा उद्रेक एवढा झालाय की अक्षरश: मनपातही हे कुत्रे बिनबोभाटपणे मुक्त संचार करीत असतात. तरी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक किशोर बाविस्कर यांनीही आयुक्तांकडे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com