गणपती नगरात दोन दुचाकींसह डॉक्टरची चारचाकी जाळली

गणपती नगरात दोन दुचाकींसह डॉक्टरची चारचाकी जाळली

रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon

गणपती नगरातील सम्राट हौसींग अपार्टमेंटमध्ये दोन दुचाकी तसेच अपार्टमेंटची इलेक्ट्रीक वायरिंग व याच अपार्टमेंटच्या शेजारी वासुकमल या अपार्टमेंटमध्ये एक डॉक्टरची चारचाकी अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकल्याची घटना आज रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिमान्शू रविंद्र महाजन वय २३ हा तरुण सम्राट हौसिंग सोसायटी येथे आपल्या परिवारासह राहतात. त्याने नेहमीप्रमाणे त्याची (एमएच १५ एफबी ७७०७) क्रमांकाची दुचाकी पार्कींगमध्ये उभी केली होती. १ मे रोजी रात्री सर्वजण जेवण करून झोपले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अपार्टमेंटच्या वॉचनमने आरडाओरड केल्याने हिंमाशू खाली आला असता त्याची व त्याच्या बाजूला असलेली वॉचनमची दुचाकी (एमएच १९ ९३२६) क्रमांकाची दुचाकी कोणीतरी पेटवून दिली होती.

पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दोन्ही दुचाकी खाक झाल्या होत्या. सकाळी ५ वाजेच्या सुमारास याच अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या वासुकमल अपार्टमेंटमध्येही डॉ. अर्चना अमेय कोतकर यांची एम.एच.१९ सी.यू. ८३६५ या क्रमाकांची चारचाकी कुणीतरी जाळल्याचे समोर आले. दोन्ही ठिकाणच्या एकाच व्यक्तीने जाळल्याचा संशय असून एकूण ९४ हजारांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही ठिकाणच्या घटनांप्रकरणी हिमांशू महाजन या तरुणाच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com