भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal

अभियांत्रिकी अर्थात इंजीनीरिंग म्हणजे प्रचंड मोठ्या शक्यतांचा महासागर आणि महासागरात उतरण्याची तयारी करण्यासाठी सज्ज व्हा, स्वतः तले गुण ओळखत, त्यांच संवर्धन करा तसेच स्वत:तील त्रुटि, अवगुण ओळखत त्यांना दूर करीत सतत आत्मपरीक्षण करा असे मार्गदर्शन इ.अँड टी.सी. विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुळकर्णी यांनी केले.

येथील श्री. संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्राममध्ये ते बोलत होते. प्रसंगी प्राचार्य डॉ. आर. पी. सिंह यांनी केले. डीन डॉ. राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ. सुधीर ओझा, प्रा. अविनाश पाटील, डॉ. पंकज भंगाळे, प्रा.अजित चौधरी, डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते.

भारतीय अभियंत्यांनी तयार केलेलं तंत्रज्ञान जागतिक पातळीवरील भविष्याच्या तंत्रज्ञानाचा आरसा आहे. गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना असे शिक्षण देण्यात येत आहे ज्याद्वारे केवळ त्यांच्याच नव्हे तर इतरांच्या आयुष्यातही परिवर्तन घडविण्याची शक्यता आहे. याची आठवण त्यांनी करून दिली. अपयशाला न घाबरता धैर्याने आपली आवड जोपासा, स्वप्नांचा पाठलाग करा आणि आपल्या कुटुंबाला आणि देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा, असे आवाहन त्यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. धिरज पाटील, प्रा. किशोर चौधरी, प्रा. अनिकेत पाठक, प्रा. युवराज परदेशी, प्रा. अभिजित इंगळे यांनी परिश्रम घेतले.