महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड !

जळगाव शहर महानगरपालिका जळगाव
जळगाव शहर महानगरपालिका जळगावJalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महानगरपालिका कर्मचार्‍यांची दिवाळी यंदाही गोड राहणार असून कार्यरत कर्मचार्‍यांसह

सेवानिवृत्त, व बडतर्फ कर्मचार्‍यांनाही याचा लाभ होणार असल्याचे मनपा कामगार संघाने स्पष्ट केले आहे.

गेल्या आठ दिवसापासून कर्मचार्‍यांना दिवाळी सणाासाठी पगार, पेन्शन व थकित महागाई हप्ता मिळावा म्हणून उपायुक्त, लेखापाल सोबत सारखी चर्चा, बैठका सुरू होत्या.

नुकतीच याबाबत अंतिम बैठक झाली. त्यात उपायुक्त देशमुख, प्रमुख लेखापाल कपील पवार सोबत कामगार संघटनेचे प्रतिनिधी पी. जी. पाटील, जगदी भावसार, जितेंद्र चांगरे, के. टी. कोळी, पी. के. पवार आदी उपस्थित होते. यावेळी सकारात्मक दृष्टीने चर्चा करण्यात आली.

कर्मचार्‍यांना अ‍ॅडव्हान्स देणे बंद आहे. कोणालाही अ‍ॅडव्हन्स मनपाकडून मिळत न्हता. पगार तोही तुटपुंजा असा हाती येत होत.

कारण ग. स. सोसायटी, प्रा. फंड, विमा व इतर किरकोळ कर्ज घेतलेले असते. त्यामुळे ती रकम पगारातून कपात करुन महिनाभर घर संसार चालवणे कठीण होवून जाते. यामुळेच महागाईचा थकित हप्ता मंजूर करण्यात आला आहे.

महागाईचा थकित हप्ता याप्रमाणे

जुलै 2016 ते मार्च 2017... 1 कोटी 26 लाख 63 हजार 761 रुपये,, 1 जानेवारी 2017 ते 31 ऑगस्ट 18... 53 लाख 78 हजार 177 रुपये, सेवानिवृत्त मयत व बडतर्फ यांचेसाठी 1 लाख 20 हजार रुपये मंजूर झाली आहे. ही रकम 10 नोव्हेंबरपयर्र्त मिळेल.

भरती, बडतर्फांबाबत चर्चा

अपुरे कर्मचार्‍यांमुळे शहराची स्वच्छता होत नाही म्हणून ज्या जाागा रिक्त आहेत त्या भराव्यात व जे कर्मचारी बडतर्फ आहेत त्याां कामावर रुजू करावे याबाबत चर्चा झाली. पी. जी. पाटील, जगदीश भावसार, जितेंद्र चांगरे, के. टी. कोळी, विलास भाकरे, पी. के. पवार, साजन जाधव, जगन मोरे, जगन मरसाळे उपस्थित होेते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com