यावल - Yaval

पपईने भरलेल्या आयशर टेम्पो अपघाताने आज जिल्हावासिय सुन्न झालले असून या अपघातात एकाचवेळी १५ जण ठार झाल्याची घटना घडली. या घटनास्थळाला नाशिक विभाग विशेष पोलीस महानिरिक्षकांनी भेट देवून पाहणी केली.

हा अपघात रात्रीच्यावेळी घडल्याने व मयत झालेले सर्व मजूर झोपेतच असल्याने ते सर्वजण पपईच्या ढिगाखाली दबले गेल्याचे समजते. या अपघाताचे वृत्त समजताच पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.

नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी किनगाव येथे घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली व चौकशीचे आदेश दिलेत यावेळी त्यांचेसोबत अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव व यावल रावेर पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व सहकारी उपस्थित होते.