पंचायतराज समितीचा जिल्हा दौरा लांबणीवर!

जिल्हा परिषदेत 22 ऐवजी 27 सप्टेंबर रोजी येणार समिती
पंचायतराज समितीचा जिल्हा दौरा लांबणीवर!

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सन 2016-2017 च्या लेखा परीक्षण अहवाल आणि 2017-2018 च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्यासंदर्भात महाराष्ट्र (Maharastra) राज्याची पंचायतराज समिती 22 सप्टेंबर रोजी येणार होती. मात्र, या समितीच्या तारखांमध्ये बदल झाला असून आता ही समिती 27 रोजी तीन दिवशीय दौर्‍यावर जळगाव जिल्हा परिषदेत येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.पंकज आशिया (CEO Dr. Pankaj Asia) यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागप्रमुखांकडून तयारी सुरु आहे.

राज्याची पंचायतराज समिती (Panchayat Raj Committee) दि.22 ते 24 सप्टेंबर दरम्यान जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याने महिन्याभरापासून जिल्हा परिषदेकडून तयारी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या विभागनिहाय प्रलंबित फाईलींगसह विविध अपूर्ण कामांचा निपटरा करण्याकडे अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा कल दिसून येत आहे. तसेच पंचायतराज समितीकडून उपस्थितीत होणार्‍या प्रश्नावलीच्या अनुषंगाने अद्यावत माहिती तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत. पंचायतराज समितीची तारीख जवळ-जवळ येत असल्याने सर्वांमध्येच धाकधुक वाढली आहे.

22 सप्टेंबरपासून तीन दिवस राज्याची पंचायतराज समिती आता 11 दिवसांनी येणार असल्याने या समितीच्या तारखांमध्ये बदल झालेला आहे. आता 22 ऐवजी 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान तीन दिवस मुक्काम ठोकणार आहे. यादरम्यान जिल्हा परिषदेमधील महिला व बालकल्याण विभागांतर्गत कुपोषण, आरोग्य विभागातील पदोन्नत्या, गौण खनिज,सॅनिटायझरचा घोटाळा आदी मुद्यांवर जि.प.प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

पंचायत राज समिती समोर जिल्हा परिषदेचे आधिकारी, कर्मचारी अशाप्रकारे सादरीकरण करणार या विषयी कर्मचार्‍यांमध्ये उत्सुकता लागून आहे. गेल्या तीन वर्षांपुर्वी पंचायत राज समितीने केलेल्या अहवाल परिक्षणात ठपका ठेवून, अधिकार्‍यांना दंड आकारण्यात आला होता. त्या पार्श्वभूमिवर अधिकारी व कर्मचारी सजगपणे राहून पीआरसीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरु आहे. शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय सुटी असूनही कामकाज केले.

पंचायतराज समिती येण्यापूर्वीच 22 सप्टेंबर रोजी जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, पशुसंवर्धन सभापती उज्जवला माळके, सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्यासह जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या सर्व विभाग प्रमुखांची अनौपचारिक बैठक होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com