नियमांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती ; मंडळासह मूर्तीकाराविरोधात गुन्हे दाखल

जिल्हापेठ, शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
नियमांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती ; मंडळासह मूर्तीकाराविरोधात गुन्हे दाखल
USER

जळगाव - Jalgaon

शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त मोठी मूर्ती तयार केली व त्या मुर्तीची स्थापना केली म्हणून शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या (District Police Thane) हद्दीतील तीन व शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीतील ३ अशा एकूण सहा गणपती मंडळाच्या (Ganpati Mandal) पदाधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून रिंगरोड येथील मुर्तीकारालाही त्यात आरोपी करण्यात आले आहे.

जिल्हापेठ पोलिसात गुन्हे दाखल

रिंगरोडवरील एलआयसी कॉलनीतील (LIC Colony) राजेंद्र राणा यांनी सात फूट उंचीची मूर्ती तयार केली. तसेच चार फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती बनवून सागरपार्कसमोरील श्रीमंत रामशेठ चौबे परिवार गणेश मंडळ, बळीराम पेठेतील कारंजा चौक येथील आझाद क्रिडा व सांस्कृतीक गणेश मंडळ व गणेश नगरातील श्रीराम गणेश मित्र मंडळ या मंडळांना विक्री केली. जिल्हाधिकार्‍यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस कर्मचारी उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन मूर्तीकार राणा याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनिवार, ११ सप्टेंबर रोजी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तर बळीरामपेठेतील गणेश नगरातील श्रीराम गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याविरोधातही जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शनिपेठेतील या मंडळाविरोधात गुन्हे

सराफ बाजारातील साईनाथ तरुण मित्रमंडळ, (मारवाडी व्यायाम शाळेजवळ) या मंडळातर्फे ४ फुटापेक्षा अधीक उंचीची गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या मंडळाच्या भोजरात मानसींग राजपुत(रा.सराफ बाजार), चेतन दिलीप तिवारी (डेमला कॉलनी), मुर्तीकार राजेंद्र चंदुलाल राणा(रा.एलआयसी कॉलनी रिंगरोड) तसेच रथ चौक

शहरातील रथ चौकातील श्रीराम तरुण सांस्कृतीक मित्र मंडळ रथ चौक या मंडळाचे पदाधिकारी जिवन पुंडलीक तायडे(रा.कोळीपेठ जळगाव), राहुल दादु मिस्तरी(कोळीपेठ) व महर्षी वाल्मीक मित्रमंडळ वाल्मीक नगरचे निलेश विश्वनाथ तायडे(रा.वाल्मीक नगर), कमलेश पुंडलीक सपकाळे (रा.वाल्मीक नगर) यांच्याविरोधात शनिपेठ पोलिसात स्वतंत्र तीन गुन्हे दाखल झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com