जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सन 2020-21 साठी जिल्हा विकास कामांसाठी 375कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर उद्भवलेल्या परीस्थितीमूळे या वर्षी जिल्हा विकास कामांसाठी 436.77 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा मंजूरी आज जिल्हा नियोजन बैठकीत देण्यात आली.

या संदर्भात दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी होणार्या अर्थसंकल्पिय विकास आराखडा बैठकीत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे मंजूरीसाठी मांडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन भवन येथे आज जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा बैठक ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, गतवर्षी सन 2020-21 साठी 300 रूपये खर्चाचा विकास आराखडा मांडण्यात येवून अतिरिक्त 75 कोटी असे 375 कोटी रूपये जिल्ह्यातील विकास कामांसाठी मंजूर करण्यात आले होते.

यावर्षी देखिल अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येणार असून महत्वांच्या विभागांना उर्वरित निधी विहित वेळेत खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे देखिल त्यांनी सांगीतले.

विविध विकास कामांसाठी 700 कोटी रूपये खर्च अपेक्षीत असून जिल्हयातील कोणतेही गाव पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी संबंधित विभागांनी मुदतीच्या आत प्रस्ताव पाठवावेत अशा सुचनांसह जिल्हा नियोजन सदस्यांना विकास कामांसाठी यावर्षी पाच लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

व पुढील नियोजनतात देखिल 5 लाख रूपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे ना.पाटील यांनी सांगीतले.