जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या व्यवहारात घोळ असून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.

दीपक जोशी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. जोशी स्वतः एकवेळा निवडणुक निर्णय अधिकारी राहिलेले आहेत. तसेच माझ्या विरुध्द त्यांना फक्त 27 मते पडलेली आहेत. केमिस्ट संघटनेचा कारभार सुरळीत सुरु असून, जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळासह माझ्यावर केलेल्या आरोपात काही तथ्य नाही. असोसिएशनच्या माध्यमातून कोणतेही चुकीचे व्यवहार झालेले नाहीत. मेडिसीन डिलर्स असोसिएशनची निवडणूक तोंडावर असल्याने दीपक जोशी यांचा हा प्रसिद्धीसाठी खटाटोप सुरु आहे. त्यांनी स्वत: आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
सुनील भंगाळे, अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन

तसेच सुनील भंगाळे व विद्यमान कार्यकारिणीने बेकायदेशीरपणे न्यासाची मिळकत व पैशांवर डल्ला मारत आहे, असा गंभीर आरोप डी.जे मेडिकलचे संचालक दीपक जोशी यांनी शुक्रवारी नवीपेठेत आयोजित पत्रकार परिषदेत केला.

जोशी पुढे म्हणाले की, सुनील भंगाळे व त्यांचे कार्यकारी मंडळाने बेकायदेशीर बनावट दस्तऐवजांच्या आधारे जळगाव डिस्ट्रीक मेडिसीन डिलर्स असोसिएशन या न्यासाची सत्ता एक हाती राखण्यासाठी निवडणूक घेतल्याचे वेळोवेळी दर्शविलेले आहे.

भंगाळे यांनी त्यांच्या मर्जीतील व सोयीच्या सदस्यांची निवडणूक निर्णय अधिकार्यांनी निवड करुन पारदर्शी निवडणूक कार्यक्रम न राबविता स्त्ता कायम हातात राहील, या उद्देशाने न्यासाच्या मंजूर घटना व नियमावलीच्या विरुद्ध जावून निवडणूक कार्यक्रम राबवितात.

तसेच भंगाळे व त्यांचे कार्यकारी मंडळ यांनी वेळोवेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीबाबत विषय चर्चेस आला असता त्या त्या वेळी न्यासाचे सभासद यांनी आर्थिक गैरव्यवहाराबाबत आक्षेप घेतला आहे.

त्यावेळी भंगाळे व त्यांचे पदाधिकार्यांना कोणतेही समर्पकपणे उत्तर देता आले नाही. तसेच न्यासाचे लेखा परीक्षण अहवाल मंजुरी पूर्वी दिलेल्या दस्तांमध्ये देखील त्या त्या मोठ्या रक्कमांचा न्यासाच्या पैशांचा विनीयोग केव्हा व कोठे करण्यात आला याबाबत देखील त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आले नाही, असेही जोशी यांनी यावेळी सांगितले.

सुनील भंगाळे व त्यांचे कार्यकारी मंडळाचे सन 1993 ते 2005 पावेतोच 4 फेरफार अर्ज धर्मदाय उपायुक्त यांच्या न्यायालयाने दि.7 फेबु्रवारी 2019 आणि दि. 29 डिसेंबर 2020 रोजी फेटाळलेले आहेत.

त्या आदेशाविरुद्ध सुनील भंगाळे यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले असून त्याचे कामकाज न्यायप्रविष्ठ आहे. तसेच भंगाळे यांचे सन 2014 ते 2017 पावेतोचे कार्यकारी मंडळास विश्वस्त पदावरुन अपात्र घोषित करुन मिळण्यासाठी देखील नाशिक येथील धर्मदाय सहआयुक्तांकडे अर्ज दाखल केला असून त्याचे कामकाज न्यायप्रविष्ठ आहे.

न्यासाच्या नावाने बी.जे मार्केट येथील मिळकत परस्पर कमी किमतीत विक्री केली असून न्यासाचा पैसा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी केला आहे, असा आरोपही दीपक जोशी यांनी केला.