जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भावा मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. करोना बाधितांच्या संख्येत लक्षणिय वाढ होत असल्याने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. 28 ते 30 मार्च पर्यंत कडक निर्बंध लागू केेले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, दि. 28 मार्च 2020 रोजी जिल्ह्यात करोनाने एंट्री केली होती.

याच दिवशी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. वर्षभरात 84 हजार 289 इतके रुग्ण बाधित झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा 28 मार्च 2020 रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. तसेच 2 एप्रिल 2020 रोजी कोरोना विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

जिल्ह्यात आतापर्यंत 84 हजार 289 इतके कोरोनाबाधित आढळून आले आहे. 71 हजार 778 इतक्या रुग्णांनी करोनावर मात केली असून, 1 हजार 569 इतक्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

दिवसेंंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणने महत्वाचे आहे. त्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि. 20 ते 30 मार्च पर्यंत कडक निबर्ंध लागू केले आहे. तीन दिवस बंद राहणार असल्याने शनिवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती.

बाजारपेठेत गर्दी

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने त्यावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तीन दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवारी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.

एकीकडे गर्दी करु नये, नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केले जात आहे. मात्र नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. होळी आणि धुलिवंदन सणावरही निर्बंध लावण्यात आले आहे.

रुग्णालये फुल्ल

कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होवू लागली आहे. जिल्हा शासकीय वेद्यकिय रुग्णालयासह खासगी हॉस्पिटलदेखील फुल्ल झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर आली आहे.