भुसावळ : आशिष पाटील -bhusawal-

डाक विभागाने मागील काही वर्षात कात टाकली असून विभागात अद्ययावत सुविधांसह अनेक महत्वपूर्ण योजनांना प्राधान्य देण्यात आले असून डाक विभागा सध्याच्या ऑनलाईन व डिजीटल विश्वात मोठी मजल मारत आगेकुच करतांना दिसत आहे.

याचाच प्रत्यय म्हणजे भुसावळ डाक विभागाने कोविड -१९ संदर्भात संपूर्ण देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान आपल्या पोस्टमन्स्च्या माध्यमातून शहरांसह खेड्यापाळ्यातील ग्राहकांनात त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमधून तब्बल १२ कोटी ११ लाख रुपयांच्या रक्कमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती डाकघर अधीक्षक पी.बी. सेलूकर यांनी केले आले.

लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना बाहेर निघण्यासाठी बंदी होती अशा काळात भुसावळ विभागातील सर्व उप डाकघरे, शाखा डाकघरे व येथील प्रधान डाकघर व विथागीूय कार्यालयातील कर्मचार्यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विभागातील भुसावळ, जामनेर, यावल, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा व बोदवड या सात तालुक्यातील पोस्टमनच्या सहाय्याने इंडिया पोस्ट पेेमेंट बँकेमार्फत ग्राहकांना फक्त आधार क्रमांक व मोबाईलच्या (एईपीएसच्या) आधारे ग्राहकांच्या कोणत्याही बँक खात्यातून निशुल्क घरपोच पैसे उपलब्ध करुन दिले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात पोस्टमनने २६ हजारहून अधिक एईपीएसच्या व्यवहारांतून तब्बल १२ कोटी ११ लाखांपेक्षा अधिक रकमेचे वितरण केले आहे.

दुर्गम भागातही सेवा- दरम्यान, लॉकडाऊन काळात पोस्टाने शहरी, ग्रामीण भागांसह अती दुर्गम अशा भागातही अखंडीत सेवा व बँकींग सेवा पुरविण्याची उपाययोजना करण्यात आली आहे.

घरपोच हायातीचा दाखला - पेन्शन धारकांसाठीच्या जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) पोस्टाच्या माध्यमातून घरपोच मिळणार आहे. यासाठी पेन्शनधारकांना पोस्टमनला आधार क्रमांक, मोबाईल व पीपीओ व पेन्शन खात्याचा क्रमांक द्यावा लागणार आहे. त्यांतर घरपोच दाखला देण्यात येणार आहे.

पोस्टतून मिळणार या सुविधा-पोस्ट ऑफिस बचत खाते व आयपीपीबीच्या ग्राहकांना इंडियन पोस्ट पेेमेंट बँकेच्या वतीने रोख रक्कम काढणे, ट्रान्सफर, बिल भरणा, डीबीटी, आधार आधारित पेमेंट सुविधा, ई-मेल द्वारे खाता स्टेटमेंट, पैसे पाठविण्यासाठी आयएमपीएस, एनीएफटी, आरटीजीएस, एसएमसएस द्वारे पोस्टाच्या बचत खात्याला आयपीपीपीएस खाते जोडणे, पोस्टाच्या विविध योजना ऑनलाईन, युपीआय आदी सुविधा देण्यात येत आहे.