‘आयुष्मान भारत मिशन’ अंतर्गत आरोग्य कार्ड वाटप

योजनेत मिळतो पाच लाखापर्यंत मोफत उपचार
‘आयुष्मान भारत मिशन’ अंतर्गत आरोग्य कार्ड वाटप

तरसोद, ता.जळगाव | Jalgaon

तालुक्यातील तरसोद येथे उद्या दि.१५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता भवानी मंदिर आवारात नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत ‘आरोग्य कार्ड’चे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नवीन लाभार्थ्यांची नोंदणीही केली जाणार आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाखापर्यंत मोफत उपचार केले जाणार जाते.

अभिषेक पाटील फाउंडेशनचे सहकार्य

या उपक्रमास जळगाव येथील अभिषेक पाटील फाउंडेशनचे अभिषेक पाटील यांचे सहकार्य लाभत आहे. यशस्वीतेसाठी जळगाव शहर राष्ट्रवादी युवक संघटनेचे सरचिटणीस पंकज बोरोले, सरपंच संतोष सावकारे व सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील प्रयत्न करत आहेत. या उपक्रमाचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

काय आहे योजना : आयुष्मान भारत योजन किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रणालीमध्ये हस्तक्षेप करणे, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक अशा दोन्ही आरोग्यांना संरक्षण देणे, हेल्थकेअरला समग्रपणे संबोधित करण्यासाठी या योजनेचे उद्दीष्ट आहे. यामध्ये आरोग्य आणि निरोगीकरण केंद्रे आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या दोन प्रमुख आरोग्य उपक्रमांचा समावेश आहे. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी ५ लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजना मार्फत देण्यात येत असते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com