आ.डॉ.सुधिर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक वितरण

चोपडा तालुक्यातील माध्यमिक व जि.प.शाळांना मिळाले संगणक
आ.डॉ.सुधिर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक वितरण

वेले ता चोपड़ा - वार्ताहर Chopada

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य आ.सुधिर तांबे यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रम-२०२०-२१ अंतर्गत चोपडा तालुक्यातील स्वा.सै.शा.शि.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चहार्डी, काळभैरव माध्यमिक विद्यालय, सनपुले, जि.प.प्राथमिक शाळा, गणपुर, जि.प.प्राथमिक शाळा, उनपदेव यांना जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.संदिप पाटील, जळगाव माध्यमिक पतपेढी माजी अध्यक्ष आर.एच.बाविस्कर, नर्मदा बचाव आंदोलनाचे प्रा.प्रदिप पाटील, तालुका समन्वयक प्रा.बाबासाहेब दिघे यांनी सुचविलेल्या वरील शाळांना नुकताच एच.पी.कंपनीचे ५०००० रु.किंमतीचे नविन संगणक वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती,चोपडा येथे संपन्न झाला.

संगणक वितरण कार्यक्रम प्रसंगी ग.स.सोसायटी,जळगांव चे माजी संचालक रमेश शिंदे,माध्यमिक पतपेढी चे अध्यक्ष विकास शिर्के, तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मंगेश भोईटे, शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष कैलास महाजन, शिक्षक भारतीचे संजय पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक एस.आर.सोनवणे, पंकज पाटील, सी.एस.पाटील, मंगेश चौधरी, रामेश्वर जाधव, विवेक पाटील, अतुल चौधरी, रितुल पाटील, रविंन्द्र पाटील, निकम सर आदि उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com